Home नाशिक ऋषिकेश कोटमे विभागस्तरीय पीक स्पर्धेत प्रथम– गहू पिकात घेतले विक्रमी हेक्टरी ६७.५०...

ऋषिकेश कोटमे विभागस्तरीय पीक स्पर्धेत प्रथम– गहू पिकात घेतले विक्रमी हेक्टरी ६७.५० क्विंटल उत्पादन

112
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230705-192158_WhatsApp.jpg

ऋषिकेश कोटमे विभागस्तरीय पीक स्पर्धेत प्रथम–

गहू पिकात घेतले विक्रमी हेक्टरी ६७.५० क्विंटल उत्पादन

दैनिक युवा मराठा
लक्ष्मण आवारे चांदवड

महाराष्ट्र शासन कृषी विभाग नाशिक जिल्हा परिषद मार्फत कोटमगाव तालुका येवला येथील प्रगतिशील शेतकरी ऋषिकेश कोटमे यांनी गव्हाचे विक्रमी उत्पादन घेत हेक्‍टरी ६७ क्विंटल ५० किलो असे उत्पादन घेऊन रब्बी हंगाम २०२१/२०२२ विभाग स्तरीय पीक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असता रब्बी हंगाम २०२१/२२ विभाग स्तरीय पीक स्पर्धेमध्ये ऋषिकेश मनोहर कोटमे यांनी प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा परिषद मार्फत शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व रोख २५०००/ रुपयांचे पारितोषिक मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले आहे.
कोटमगाव तालुका येवला येथील प्रगतशील शेतकरी ऋषिकेश मनोहर कोटमे व लहान बंधू दीपक मनोहर कोटमे हे आपल्या वडिलोपार्जित जमिनीत वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेत परिसरात एक प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला आहे.
फुल शेतीमध्ये झेंडू व इतर पिकांमध्ये गहू, कांदे, सोयाबीन, मका, इत्यादी पिके ते घेत असतात पंचक्रोशी मध्ये ऋषिकेश कोटमे व दीपक कोटमे यांना प्रगतशील शेतकरी म्हणून बघितले जाते.

@ आतापर्यंत ऋषिकेश मनोहर कोटमे यांनी आपल्या शेतामध्ये अनेक वेगवेगळे पिकांचं उत्पादन घेतल आहे,ते नेहमी शेतामध्ये नवीन पिक व भाजीपाला घेण्यासाठी आग्रह असतात. भाजीपालामध्ये हिरवी मिरची, कोबी, फ्लाॅवर, कारली, दुधी भोपळा,टोमॅटो व द्राक्षाची बाग त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगवलेली आहे.
कोरोनाच्या काळात त्यांनी आपली द्राक्ष विकायला आलेले असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करून जागेवर शेतामध्ये दोन एकराची द्राक्ष विकलेले आहेत.

@ नवनवीन पिकांचे उत्पादन घेताना अतिशय मेहनत व पाणी व माती व्यवस्थापन कुशलतेने करून चांगल्या प्रतीचे उत्पादन घेण्याचा ते सातत्याने प्रयोग करत असतात. या कामी त्यांची वडील मनोहर कोटमे,आई सुमनबाई ,लहान बंधू दिपक कोटमे, पत्नी सारीका व भावजय सुरेखा तसेच घरातील मुले,मुली यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
ऋषिकेश कोटमे– विभागस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त शेतकरी (कोटमगाव) येवला

Previous articleपिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे कारभारी अजितदादांच्या पाठीशी..
Next articleलातूर जिल्ह्यात शिवसेना (उध्दव ठाकरे गटाच्या ) नियुक्त्या जोरात सुरु!             
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here