Home पुणे मोडक इंटरनॅशनल स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

मोडक इंटरनॅशनल स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

82
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230621-222535_WhatsApp.jpg

पुणे वडकी :- मोडक इंटरनॅशनल स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
पुणे :ब्युरो चिफ. उमेश पाटील
वडकी :- संजय मोडक एज्युकेशन सोसायटी संचलित मोडक इंटरनॅशनल स्कूल वडकी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले. याप्रसंगी शिक्षकांनीही योगामध्ये भाग घेऊन मुलांना प्रोत्साहित केले. स्कूलच्या प्रिन्सिपल लक्ष्मी छाया पवार मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगाचे फायदे उद्देश तसेच योग दिनाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी बोलताना दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो तसेच युवक भारतीय धार्मिक आणि अध्यात्मिक परंपरातील एक मार्ग आहे ज्या माध्यमातून मानसिक शारीरिक आध्यात्मिक आणि सामाजिक उन्नती होते रोज योगा केल्याने संतुलन वाढविणे संयम जीवनशैल्य आरोग्य चांगले राहते. अशा पद्धतीचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे वडकी गावचे सरपंच श्री.अरुण दादा गायकवाड. संस्थेचे अध्यक्ष श्री संजय वसंत मोडक तसेच सेक्रेटरी मनीषा मोडक प्रिन्सिपल शिक्षक रुंद आधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here