Home पुणे मनःशांती, आरोग्य आणि आनंदासाठी विद्यार्थ्यानी रोज योग करावा……. शिवाजीराव माने

मनःशांती, आरोग्य आणि आनंदासाठी विद्यार्थ्यानी रोज योग करावा……. शिवाजीराव माने

157

आशाताई बच्छाव

IMG-20230621-WA0065.jpg

मनःशांती, आरोग्य आणि आनंदासाठी विद्यार्थ्यानी रोज योग करावा……. शिवाजीराव माने
पुणे :ब्युरो चिफ. उमेश. पाटील
सांगवी:- मनःशांती, आरोग्य आणि आनंदासाठी विद्यार्थ्यानी दररोज योग्य मार्गदर्शनाखाली योग अभ्यास करावा.आजच्या मोबाईलच्या दुनियेत एकाग्रता वाढवायची असेल व आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर रोज योग साधना केली पाहिजे असे मत आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कै. सौ .शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर, नूतन माध्यमिक विद्यालय सांगवी आयोजीत कार्यक्रमात त्यांनी व्यक्त केले . रोज मुलांनी व्यायाम केला पाहिजे असे ते म्हणाले शाळेचे मुख्याध्यापक मा. शिवाजीराव माने यांनी मुलांकडून योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली व त्यांचे महत्व मुलांना समजावून सांगितले . या वेळी ओंकार, प्रार्थना, पूरक हालचाली, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यानधारणा, पदमासन, वज्रासन, तडासन, इ. आसने विद्यार्थ्यानी केली. एका वेळी एकूण ५८० विद्यार्थी , शिक्षक, पालक यांनी योगदानाची प्रात्यक्षिके केली. संस्थेचे सचिव तुळशीराम नवले कार्यक्रमाचे अध्यक्ष होतें.
या कार्यक्रमास सुनीता टेकवडे, हेमलता नवले, सीमा पाटील, मनिषा लाड, पांचशिला वाघमारे, शितल शितोळे, श्रद्धा जाधव, दिपाली झणझने, भाग्यश्री कोकाटे, संध्या पुरोहित, भारती घोरपडे, निर्मला भोईटे, कुसुम ढमाले, इ शिक्षक वर्ग पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे प्रस्ताविक दत्तात्रय जगताप यांनी केले व आभार स्वप्निल कदम यांनी मनाले. शाळेत योगदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

Previous articleमतदार याद्या बारकाईने अद्ययावत करा : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
Next articleमोडक इंटरनॅशनल स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.