Home उतर महाराष्ट्र माझी शाळा जि. प.शाळा,छान माझी शाळा,आई वडिलापेक्षा श्रेष्ठ माझे गुरू, ज्ञानमंदिर माझी...

माझी शाळा जि. प.शाळा,छान माझी शाळा,आई वडिलापेक्षा श्रेष्ठ माझे गुरू, ज्ञानमंदिर माझी शाळा -कु नूतन जाधव

107
0

आशाताई बच्छाव

IMG-20230619-WA0071.jpg

माझी शाळा जि. प.शाळा,छान माझी शाळा,आई वडिलापेक्षा श्रेष्ठ माझे गुरू, ज्ञानमंदिर माझी शाळा -कु नूतन जाधव

वासखेडी/धुळे दिपक जाधव ब्युरो चीफ – येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी कु,नूतन दिपक जाधव इ.दुसरीची चिमुरडी तिचा शाळेतील पहिल्या दिवशी आपल्या लहान भावासाठी पहिलीच्या वर्गांत अति प्रसन्नतापूर्वक आपल्या आजी व आईंना सोबत घेऊन जि.प.शाळेत प्रवेश करा असा संदेश देत शाळेत प्रवेश केला,जि.प.शाळेच्या शिक्षणासारखे शिक्षण कुठेच नाही,आईवडीलांसारखे गुरू माझ्या शाळेत आहेत असा प्रबोधनात्मक संदेश देखील त्या चिमुरडीने दिला,माझे शिक्षण माझी शाळा माझे गुरू माझा अभिमान मी नेहमीच ठेवेल तेच संस्कार या लहान रोपट्यांना देतात अशी जनजागृती करतांना दिसुन आली,शाळेत जाऊया चांगले संस्कार घेऊया हा संदेश ती घरोघरी,गल्लोगल्ली देते,आजुबाजूच्या मुलांना व आदीवासी मुलांना देखील हात सोबत शाळे पर्यंत नेते हाच तिचा गुरूनी घडविलेला शिक्षणाचा खरा आदर्श होय,शाळा प्रवेश समारोह प्रसंगी,शाळेच्या मुख्याध्यापिक सौ,संगिता पाटील व त्यांचे सहकारी शिक्षक वृंद यांनी गावातुन भव्य दिव्य घोड्यावरून फेटेबांधत,भारत हा शेतीप्रधान देश आहे म्हणुन बैलगाडीतून देखील मिरवणुकीचे भव्य आयोजन करत गावातील नागरीक प्रसन्नतापूर्वक म्हणाले की,माझा पाल्य जि.प.शाळेतच गेला पाहीजे हा या रलीचा संदेश होय,यावेळी पहीलीच्या वर्गातील प्रवेश घेतलेल्या चिमुरड्यांचे मान्यवरांच्या हस्ते फुल देत त्यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here