Home पुणे ऑलम्पिक विजेते मुरलीकांत पेठकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान.

ऑलम्पिक विजेते मुरलीकांत पेठकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान.

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20230619-WA0070.jpg

ऑलम्पिक विजेते मुरलीकांत पेठकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान.
पुणे :ब्युरो चिफ. उमेश. पाटील
पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि प्यारा ओलंपिक गोल्ड मेडलिस्ट श्री मुरलीधर पेठकर यांनी आयुक्तांचे केले कौतुक.
महानगरपालिकेचे पाठबळ असले की काय घडू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे
पिंपळे गुरव येथील काळुराम जगताप जलतरण तलाव येथे समर स्विमिंग कोचिंगचा दि 16 जून 2023 रोजी संपन्न झालेला प्रमाणपत्र वितरण सोहळा.या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भारताचे पहिले प्यारा ओलंपिक विजेते व जागतिक विक्रमवीर,तसेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त मुरलीकांत पेठकर यांनी भूषवले.

पेठकर यांच्या हस्ते या सोहळ्यात दीडशे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफीचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाचे कौतुक केले ते म्हणाले पालिकेने जलतरण तलाव उपलब्ध केल्यामुळे समर स्विमिंग सारख्या प्रोफेशनल कोचेस ना एक खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो आणि त्यातूनच भविष्यातील चांगले जलतरणपटू तयार होऊ शकतील.
याप्रसंगी या क्लासच्या संचालिका विद्या कदम यांनी पण पेठकर म्हणल्याप्रमाणे याचे संपूर्ण श्रेय पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह तसेच जितेंद्र वाघ व क्रीडायुक्त मनोज लोणकर यांना दिले.
यावेळी एक्स स्विमिंग कोच श्री पी डी पाटील यांचे बहुमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका घोडके यांनी केले आभार रवींद्र कांबळे यांनी मानले.

Previous articleयुवा नेते प्रशांत पाटील अचेगावकर यांची काँग्रेस कमिटी नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी निवड.
Next articleमाझी शाळा जि. प.शाळा,छान माझी शाळा,आई वडिलापेक्षा श्रेष्ठ माझे गुरू, ज्ञानमंदिर माझी शाळा -कु नूतन जाधव
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here