Home नांदेड शासन आपल्या दारी या अभिनव उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

शासन आपल्या दारी या अभिनव उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

109
0

आशाताई बच्छाव

IMG-20230615-WA0040.jpg

शासन आपल्या दारी या अभिनव उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

· डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला विकासाच्या प्रवाहात समावून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “शासन आपल्या दारी” ही अभिनव योजना हाती घेतली आहे. राज्यामध्ये विविध जिल्ह्यात या अभिनव उपक्रमाने सर्वसामान्य जनतेच्या मनात शासकीय योजनांप्रती सकारात्मक आत्मविश्वास निर्माण केला असून नांदेड येथे येत्या काही दिवसातच हा भव्य उपक्रम आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन आणि विविध विभागाचे मंत्री सहभागी होणार आहेत. यादृष्टिने आज प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची व्यापक आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बराटे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

ज्या घटकांसाठी योजना शासनाने तयार केल्या आहेत त्या घटकांच्या मनात योजनांप्रती आस्था व सकारात्मक भाव असणे तेवढेच अत्यावश्यक असते. यातूनच लाभार्थ्यांच्या प्रगतीचा मार्ग सुरू होतो. सर्व विभाग प्रमुखांनी शासकीय योजनांकडे लाभार्थ्याच्या मनात हा आत्मविश्वास देणे आवश्यक असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी बोरगावकर यांनी सांगितले. ज्या लाभार्थ्यांनी शासकीय योजनाच्या माध्यमातून विविध आव्हानांवर मात करून यश मिळविले, अशा प्रातिनिधीक लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन व मान्यवरांच्या हस्ते या प्रस्तावित भव्य कार्यक्रमात सन्मान केला जाणार आहे.

Previous articleउस लागवड मार्गदर्शनासाठी संचालक मंडळ आऋल्या दारी
Next articleसंग्रामपूर तहसीलला लाभले कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश्वर टोम्पे. युवा मराठा टीमने पुष्पगुच्छ देऊन अनेक विषयावर साधला वार्तालाभ!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here