आशाताई बच्छाव
नमस्कार, आपणा सर्वांना माझा नमस्कार, मी स्वतः श्री डॉक्टर संजय वाघमारे हवेली तालुका प्रतिनिधी पुणे. मी आपल्या या युवा मराठा न्यूज या पत्रकारिता मध्ये निवड झाल्यापासून, मी अनेक गरीब लोकांचे प्रश्न सोडवायला गेलो. अनेक ठिकाणी मला रस्त्यामध्ये गाडी चालवताना काही लोकांवरती अन्याय झालेला दिसला, त्यामध्ये सहभागी होऊन तो सोडवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये गरीब लोकांची तक्रार सुद्धा ऐकून घेत नसताना त्यांनाही तक्रार ऐकून घेण्यास भाग पाडले. हे सर्व सहकार्य करत असताना, पत्रकाराचा नियम पाळत असताना मला स्वतःला मानसिक त्रास त्याच बरोबर लोकांकडून, अधिकाऱ्यांकडून सामाजिक तत्त्वांमध्ये खूप त्रास सहन करावा लागला. कारण या समाजामध्ये काम करत असताना चांगल्या कामाला नेहमी लोक त्रास देतात हा खूप मोठा अनुभव या दोन वर्षांमध्ये मला आला. एक प्रामाणिक पत्रकार म्हणून व एक चांगला नागरिक म्हणून लोकांचे सहकार्य करणे तेही विनामूल्य हा माझा स्वभाव असल्याकारणाने मी नेहमी लोकांचे सहकार्य करत असतो. कारण मला एकच कळतं देवाने त्रास सहन करणारी लोकं फार कमी बनवले आहेत त्यामध्ये आपण आहोत असे समजून अनेक लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. आहे बऱ्याच वेळा ज्यांचे प्रश्न सोडवले त्यांनाही त्या गोष्टीची जाणीव राहिली नाही,हाही अनुभव त्या ठिकाणी बऱ्याच वेळा पाहायला मिळाला. हरकत नाही समाजामध्ये काम करत असताना या सगळ्या गोष्टींचा अनुभव येणारच कारण जो काम करतो त्याला नक्कीच त्रास होतो. प्रामाणिकपणा न सोडणे हाच एक मूलमंत्रण ठेवून लोकांकडून मला कोणी चांगलं म्हणेल याची अपेक्षा न करता, माझी कुणी वावा करेल याची अपेक्षा न करता आपले सामाजिक कौशल्य, सामाजिक ज्ञान त्याचबरोबर लोकांचे प्रश्न सोडवण्याचे कौशल्य हे अंगी बाळगून हे सर्व प्रयत्न मी नेहमी करत राहील. धन्यवाद तुमचाच पत्रकार हवेली तालुका प्रतिनिधी पुणे श्री संजय वाघमारे.