आशाताई बच्छाव
कै. विश्वनाथराव नळगे विद्यालयाचा दहावीचा निकाल ९३.४६ टक्के
# मोरे गायत्री ९८ टक्के घेऊन प्रथम
अंबादास पाटिल पवार
लोहा,(प्रतिनिधी)
लोहा शहरातील कै.विश्वनाथराव नळगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने अखंडीतपणे उज्वल यशाची परंपरा कायम राखत शाळेतील कु.मोरे गायत्री कल्याण हिने ९८ टक्के घेउन प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान मिळवला तर कु. शरयू काशिनाथ शिरशीकर ९७.८०, व चुडावेकर सेजल सुरेश ९७.८० टक्के द्वितीय क्रमांक तर चाडोळकर साक्षी विश्वनाथ ९७.४० टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकावला.
शाळेचा दहावीचा निकाल ९३.४६ टक्के लागला असून सेमी इंग्रजी १०० टक्के, विशेष प्राविण्य ९४ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ८१, द्वितीय श्रेणीत ४०, पास १४ विद्यार्थी झाले आहेत.
कांजले सोमनाथ सूर्यकांत ९७.२०, अरसुलवाड समर्थ बालाजीराव ९६.८०, महाबळे रूतिका भारत ९६.६०, चांडोळकर श्रुती विश्वनाथ ९५.८०, नागसाखरे ऋतुजा शिवलिंग ९५.६०, मुंडे सानिका नारायण ९५.४०, गायवाड श्रीजल हनुमंतराव ९५.२०, दमकोडवार समीक्षा गजेंद्र ९५.२०, आणि राव ओंकार लक्ष्मण ९५.००, गोपचूडे सुप्रिया संदीप ९४.००, इंगळे ज्ञानेश्वर धनाजी ९४.००, नागसाखरे अनुजा बालाजी ९३.४०, किटे दीक्षा संजय ९३.२०, पावडे साक्षी धोंडीबा ९३.२०, खेडकर रुद्र शिवसाभ ९२.२०, शिवानी विठ्ठल कदम ९१.८०, आदिती बालाजी लांडगे ९१.८०, भुजबळ अश्विनी अशोक ९१.६०, शिवम गजानन करंजे ९०.६०, गायत्री राजू जैन ९०.४०, पवार संध्या बालाजी ९०.४०, आळंदे आदित्य आदिनाथ ९०.००, पवार प्रसाद यादव ९०.००, आदींनी गुणवंत होण्याचा बहुमान मिळवला. विशेष म्हणजे सेमी इंग्लिश चा निकाल १०० टक्के लागला. यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष केरबा सावकार बिडवई,उपाध्यक्ष शंकरराव ऊतरवार, सचिव अशोकराव चव्हाण, मुख्याध्यापक नागेश्वर व्ही. एल., पर्यवेक्षक माळवदकर जी. एल. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.तसेच पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.