आशाताई बच्छाव
संजय राऊत विरोधात शिवसेना शिंदे गटाचे”जोडे मारो”आंदोलन; मानसिक आरोग्य बिघडल्या
ची टीका.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पी एन देशमुख.
अमरावती.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शनिवारी राजकमल चौकार शिंदे गटाच्या शिवसेने कडुन”जोडी मारो “आंदोलन करण्यात आले. राऊत यांचे मानसिक आरोग्य ठिकाणावर नसल्याने ते बेताल वक्तव्य व कृती करत असल्याची टीका करत, राऊत यांच्या प्रतीकात्मक फोटो असलेल्या पोस्टला चपला मारून त्यांच्या जाहीर निषेध नोंदविण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी या प्रश्नावर तु म्हणत थुंकणे
याची कृती करीत प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे त्यांच्या या कृतीचा राज्यभरात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून त्रिव नाराजी व्यक्त होत असून,”जोडी मारो”आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अमरावतीमध्येही राजकमल चौकात शिंदे गटाने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अमरावतीमध्ये राजकमल चौकात शिंदे
गटने आंदोलन करत राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पोस्टर वरील राऊत यांच्या फोटोला जोडे मारून पोस्टर काढण्यात आले. यावेळी आंदोलनामध्ये शिवसेना जिल्हा अध्यक्ष अरुण पडोळे, शिवसेना महानगरप्रमुख शिंदे गट संतोष बद्रे, युवा सेना चे जिल्हाध्यक्ष प्रवीण दीधाते, शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख आशिष ठाकरे, कामगार सेनेचे वेदांत ताल्हन, महिला आघाडी जिल्हा प्रमुख अरुणा इंगोले, वृंदाताई मुत्तेवार, प्रीती शाहू, सीमा ढोले, रश्मी डहाणे ,पुरुषोत्तम बनसोड, गुणवंत हरणे, शेख मुजमील अन्सारी, प्रथमेश बोबडे, गोपाल जाधव, सुरज बहादुरकर, अखिल ठाकरे सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते