Home संपादकीय संपादकीय अग्रलेख… “श्री.गणेश तुला सदबुध्दी कधी मिळणार?”

संपादकीय अग्रलेख… “श्री.गणेश तुला सदबुध्दी कधी मिळणार?”

84
0

आशाताई बच्छाव

IMG-20230408-WA0041.jpg

संपादकीय अग्रलेख…                            “श्री.गणेश तुला सदबुध्दी कधी मिळणार?”    वाचकहो, आम्ही श्री.गणेशला सुखकर्ता,दुःख हर्ता म्हणतो,प्रत्येक शुभकार्यात गणेशाची पुजा करतो.गणेश हा सुखकारक व आनंददायक संदेश देणारा म्हणून ओळखला जातो.मात्र व-हाणे प्रकरणात चौकशी समितीच्या नावाखाली नियुक्त केलेला गणेश अर्थातच नांदगावचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी हा पौराणिक काळातील गणेशाच्या विचारांनुसार न वागता,व-हाणेत येऊन चौकशी करण्याच्या नावाखाली नको ते उपद्व्याप भामटया सडकछाप राजकारण्यांच्या दडपणाला बळी पडून व आर्थिक मलिदा घशात घालून खरेचे खोटे प्रमाणे चौकशी अहवाल बनवून मार्गस्थ झाले खरे.गणेशाने अर्थातच गणेश चौधरी यांनी आपल्या कर्तव्यांशी व असलेल्या नोकरीशी प्रामाणिकता दाखवून इमानदारीने कर्तव्य न करता व-हाणे चौकशी प्रकरणात अक्षरशः बेईमानी केली.सगळेच अधिकार जर मालेगांवच्या गटविकास अधिकाऱ्यांना होते व त्यांनीच कारवाई करण्याचे मत जर गणपती मांडतो तर हा निव्वळ चौकशी समितीचा फार्स व स्टंटबाजी कशासाठी? गत तीन वर्षापासून चालविलेली युवा मराठाची फसवणूक व दिशाभूल आणि वेठीस धरण्याचे प्रयोजन प्रशासनाच्या कसे अंगलट येणार आहे हे लवकरच कळेल.मात्र आमच्या एक निर्दशनास आले की,एका महिलेला तिच्या चुकावर पांघरुण टाकून वाचविण्यासाठी संपूर्ण जिल्हा भरातील अधिकाऱ्यांची कशी उठाठेव सुरु आहे हे या निमिताने समोर आले आहे.व-हाणे प्रकरण हे कधी न संपणारे असून,अधिकाऱ्यांनी निदान नितीमतेची चाड व आपल्या लेकराबाळांची आण(शपथ) घेऊन काम केल्यास निश्चितच हा प्रश्न चुटकीसरशी मोकळा होऊ शकतो.अन्यथा चौकशी समितीच्या नावाखाली एन्जाँय ट्रिपला आलेल्या चौकशी समितीने हाँटेलात झोडलेल्या पार्ट्या व आणखीन खिसा गरम हे खुप सांगून जाते.अर्थातच आता व-हाणेतही काय ते डोंगार…काय ते हाटील असे म्हणण्याची वेळ आली आहे.पण…सावधान कधी आपण अडकू नये हिच अपेक्षा या निमिताने सदराया सदगुणी गणपती बाप्पा आपणांस देवो, याच गणेश (चौधरी) नव्हे प्रार्थना !

Previous articleपावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्याची मागणी. मोरया पार्क नागरिकांनी केली
Next articleतहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here