Home अमरावती चांदूरबाजार तालुक्यातील बेलूरागडी येथे शेतकऱ्यांच्या नावावर वाळू व मुरूम ची अवैद्य वाहतूक,...

चांदूरबाजार तालुक्यातील बेलूरागडी येथे शेतकऱ्यांच्या नावावर वाळू व मुरूम ची अवैद्य वाहतूक, गुन्हे दाखल करणार काय.

108
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230531-084524_WhatsApp.jpg

चांदूरबाजार तालुक्यातील बेलूरागडी येथे शेतकऱ्यांच्या
नावावर वाळू व मुरूम ची अवैद्य वाहतूक, गुन्हे दाखल करणार काय.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पी .एन .देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुका बेलुरागडी या गावात शेतकऱ्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक महसूल विभागाने दोन दिवसापूर्वी ४२ब्रास वाळू जप्त करून ती घरकुल लाभार्थी यांना मोफत वाटप केले. ती वाळू शेतकऱ्याने घेतलेल्या परवानगीच्या नावाखाली ने आन केली जात होती. जिल्ह्यातील अशा प्रकारची पहिली कारवाई आहे. बेडूरागडी या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात टिप्पर आणि ट्रॅक्टरने वाळूची वाहतूक केली जाते. याबाबत अधिक माहिती घेतली असता शेतकरी आनंद अटल कार यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे गट क्रमांक ६ मधून वाळू उचलण्यासाठी परवानगी मागितली होती त्याआधारे त्यांना ८०ब्रासची परवानगी जिल्हा स्तरावरून घेण्यात आली. मात्र प्रत्यक्ष त्या ठिकाण्यावरुन८०ब्रासपेक्षा अधिक वाळू विक्री केली गेली. जेव्हा महसूल अधिकारी त्या ठिकाणी कारवाईसाठी गेले तेव्हा शेतकरी यांनी माझा या वाळू वाहतुकीची काही संबंध नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या नावाचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू तस्करी सुरू असल्याचे स्पष्ट झाली. अशाच प्रकार महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर मुरूम वरती किंवा बस सुरू आहे. याकडे मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. मुळात बेलुरा गाडी या ठिकाणावरून वाळू वाहतूक सुरु होती. वाहनाची माहिती असून देखील महसूल विभागाकडून त्या वाहणार गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे या अवैध वाळू तस्करीला महसूल विभागाकडून पाठबळ दिले जात आहे का. असा प्रश्न उपस्थित होत आहे. तामसवाडी, हीरूळपूर्ण, पूर्ण मध्यम प्रकल्प, धानोरा या ठिकाणी भाजप पदाधिकारी गोपाल तीरमारे,मुरली माकोडे यांनी होत असलेल्या अवैध वाळु होत असल्याचे पुरावे संबंधितांना दिले होते. त्यानंतर कारवाई सुरू झाली. चांदूर बाजारातील या कामासाठी एकच नायब तहसीलदार आहे. संपूर्ण तालुका भर त्यांनाच लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे रिक्त असलेल्या नाहीत तहसीलदार पदाकडे आमदार बच्चुभाऊ कडू यांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे. अमरावती जिल्हा खनि कर्म अधिकारी इमरान शेख मनाली की शेतकरी यांनी वाळू काढण्याच्या परवानगीसाठी कायदेशीर बाबी पूर्ण करून अर्ज केला होता. त्या आधारे त्यांना ८०ब्रासची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी त्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणावर अवध्य वाळू तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून आता अवैध वाळू तस्करासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहन दाताची चौकशी करून गुंडा दाखल करण्यासाठी पत्रा देण्यात येणार आहे.

Previous articleछत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरात युवकांना मार्गदर्शन
Next articleएकलारा येथे प्राधान्य कुटुंब व अंत्योदय घरपोच शिधापत्रिकेचे वाटप !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here