Home नांदेड एकलारा येथे प्राधान्य कुटुंब व अंत्योदय घरपोच शिधापत्रिकेचे वाटप !

एकलारा येथे प्राधान्य कुटुंब व अंत्योदय घरपोच शिधापत्रिकेचे वाटप !

159
0

आशाताई बच्छाव

IMG-20230531-WA0009.jpg

एकलारा येथे प्राधान्य कुटुंब व अंत्योदय घरपोच शिधापत्रिकेचे वाटप !
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
मुखेड -दिनांक 29/05/2023 रोजी मौ. एकलारा ता. मुखेड जि.नांदेड येथे शासन आपल्या दारी या नविन उपक्रमाअंतर्गत प्राधान्य कुटूंब योजनेअंतर्गत 17 व अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत 03 पात्र लाभार्थी यांना व्दारपोच शिधापत्रिकांचे वाटप मा. कुलदीप जंगम (भा.प्र.से.), सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देगलूर जि.नांदेड तसेच मा. काशिनाथ पाटील, तहसिलदार मुखेड, यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देगलूर जि.नांदेड यांनी ग्रामिण भागातून मुखेड शहरात यावयाचा वेळ व पैसा वाचेल या दृष्टीकोणातून गांवातील विदयार्थी, शेतकरी, निराधार यांना त्यांना देय असलेल्या योजना / लाभ तसेच विविध प्रमाणपत्रे इत्यादी हे गावपातळीवर उपस्थित राहून देण्याचा मानस व्यक्त केला,

सदर कार्यक्रमास मा. कुलदीप जंगम (भा.प्र.से.), सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देगलूर जि.नांदेड तसेच मा. काशिनाथ पाटील, तहसिलदार मुखेड, मा. विजयकुमार पाटे, नायब तहसिलदार मुखेड, विशाल पेंडकर अव्वल कारकून, तहसिल कार्यालय मुखेड, कोनुले, मंडळ अधिकारी जाहूर, आर.जी. कापसे तलाठी सज्जा एकलारा व खेळभांडे ग्रामसेवक एकलारा हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here