आशाताई बच्छाव
पावसाळ्यापूर्वी विजेच्या कामांना प्राधान्याची गरज..!
विद्युत खांबाना कुठे”कुठे झाडांच्या फांद्यांचा अडसळ.!
विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे
युवा मराठा न्यूज नेटवर्क
संग्रामपूर तालुक्यामध्ये पावसाळ्याच्या पुर्वी विजवितरण कंपनी च्या माध्यमातून विजवाहक तारा, विद्युत पोलांना ठीक ठिकाणी झाडांच्या फांद्या तारामधुन गेल्याने अनेकदा पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव अनुभवायला मिळतो आणि ऐन पावसाळ्यात विजेचा लपंडावा मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वेळे अगोदर विजवितरण कंपनीने तारा, विद्युत पोल मधुन गेलेल्या झाडांच्या फांद्या, पाळण्यासारखे लटकणारे तारांचे काम सुद्धा व्यवस्थित केले पाहिजेत व पावसाळ्या अगोदर करणे आवश्यक आहे. विद्युत ठिकाणी 33 केव्ही, 11 केव्हीच्या प्रवाहांत विद्युत वाहीण्या मध्ये झाडांच्या फांद्यामध्ये विद्युत तार अडकलेले दिसतो किंवा काही ठिकाणी तर विद्युत पोलच्या तारा झाडांच्या फांद्या किंवा गराडा घातलेला दिसतो. यामुळे अनेकदा प्रवाहीत विजतारामध्ये घर्षण निर्माण होतो या कारणांमुळे विजपुरवठा खंडीत होतो. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पावसाळ्यामध्ये विजेचे काम करण्याचा त्रास होतो. परंतु पावसा मध्ये प्रवाहीत विज किंवा विद्युत पोल, ला गराडा घातलेल्या हिरव्या वेली, झाडांच्या फांद्यांची साफसफाई करणे आवश्यक आहे. परंतु तालुक्यामधील काही गावांमध्ये स्वतंत्र लाईनमन नाहीत, पावसाळा अवघ्या पंधरा दिवसावर येऊन ठेपलेला आहे. पावसाळ्या मध्ये जोराचा पाऊस, हवेने अनेकदा विजेचा लपंडाव हा नेहमीचाच असतो. अनेकदा घरातील विज गेल्याने पावसाळ्यात डास, मच्चारांच्या प्रादुर्भावाने साथरोगाची लागण होते. पावसाळ्या मध्ये विजेचा
लपंडाव हा प्रामुख्याने प्रवाहीत विद्युत वाहीण्या एकमेकांना घर्षण झाल्याने आभाळा मधून पाऊस तर विजेच्या तारा मधून गोळे पडताना पाहायला सुद्धा मिळतात त्यामुळे आवश्यक पणे विजेचे तार वृक्षांच्या फांद्यामध्ये अडकलेले असतील त्या ठिकाणाहून विजेचे तार मोकळे करण्यात यावे
तसेच विजेचे कनेक्शन मात्र प्रत्येक गावखेड्या पर्यंत पोहचलेले आहेत. परंतु देखभाल दुरुस्ती साठी काही गावातील लोखंडी पोल जमीन लेवल ला अक्षरशः निर्जीव अवस्थेत झाले आहेत ते केव्हाही हवेमुळे पडु शकतात त्यामुळे जीवितहानी सुद्धा होऊ शकते.मात्र लाईनमन ची मोठया प्रमाणात कमी आहे. अवघ्या बोटावर मोजण्या ऐवढ्याच गावांना स्वतंत्र लाईमन मिळालेले आहेत. त्यामुळे आधीच तालुक्यातील नागरिक
विजेच्या लपंडावाने त्रस्त आहेत. त्यामुळे अनेक गावांना हक्काच्या लाईमनची प्रतीक्षा कायम आहे आधीच लाईमणचा अभाव आसल्याने
विजवितरण कंपनीने पावसाळ्या पुर्वीच्या कामांना प्राधान्य देण्याची मागणी सामान्य जनतेकडून होत आहे.