Home नागपूर अखिल भारतीय वारकरी मंडळ अक्कलकोट व समर्थ नगरी प्रतिष्ठानच्या वतीने वारकरी मंच...

अखिल भारतीय वारकरी मंडळ अक्कलकोट व समर्थ नगरी प्रतिष्ठानच्या वतीने वारकरी मंच नागपुर शहराला “स्वामी सेवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर-

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20230525-WA0035.jpg

अखिल भारतीय वारकरी मंडळ अक्कलकोट व समर्थ नगरी प्रतिष्ठानच्या वतीने वारकरी मंच नागपुर शहराला “स्वामी सेवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर–

30 मे रोजी कात्रज पुणे येथे पारितोषिक वितरण होणार

दैनिक युवा मराठा
निफाड रामभाऊ आवारे

अध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने प्रेरित होऊन हभप निलेश महाराज कोंडे- देशमुख (आळंदी देवाची) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापना करण्यात आलेल्या वारकरी मंच सातत्याने धार्मिक कार्यात सहभागी होत असून वारकरी मंच नागपूर शहर विविध उपक्रमांचे आयोजन करून एक नवीन आदर्श निर्माण करत आहे. नागपूर शहर वारकरी मंचच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय वारकरी मंडळ अक्कलकोट आणि समर्थ नगरी प्रतिष्ठान यांचे तर्फे वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांना श्री स्वामी सेवा रत्न हा सन्मान (पुरस्कार) देऊन सन्मानित करण्यात येत आहे. या वर्षी वारकरी मंच नागपूर शहर या संस्थेस हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
मंगळवार 30 मे रोजी कात्रज पुणे येथे समारंभ पूर्वक महान विभूतींच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण होणार असून या पुरस्कार वितरण सोहळ्यास आपण उपस्थित राहावे असे आव्हान वारकरी मंच नागपूर जिल्हा अध्यक्ष मयूर वाजगे यांनी केले आहे.
उल्लेखनीय कार्य करून वारकरी मंच नागपूर शहराच्या वतीने वारकरी मंच नागपूर जिल्हाध्यक्ष मयूर वाजगे, नागपुर शहर पदाधिकारी नागपुर जिल्हा सचिव विनीत भिवगडे, शहराध्यक्ष दिनेश कांबळे, सचिव मनीष ठक्कर युवराज बुरघाटे, कोषाध्यक्ष तेजस घोडे, हिमांशु हावरे, निशांत वानखेडे, वेद खरे, गौरव सावंत, आयुष दंदी, अथर्व करुटकर, देवेंद्र मांडवकर, प्रणय ईखार, नकुल पिंपळापुरे, आणि टीम विठ्ठल पदाधिकारी यश बेले, मेहुल बेले, देवेंद्र राऊत, दुशांत जूनघरे, भावेश बुरीले, देवांशू बेले, रोहित बुधे, सोहम पालोदे, अनिकेत निनावे, सागर ठाकरे, निखिल येमदे यांचे विशेष योगदान लाभले आहे.
या पुरस्काराबद्दल समर्थ नगरी अध्यात्मिक राज्यस्तरीय समिती, वारकरी मंच संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. निलेश कोंडे -देशमुख महाराज आळंदीकर, बाबासाहेब सोनटक्के अध्यात्मिक विभाग प्रमुख, डॉ रविंद्र भोळे वैद्यकीय विभाग प्रमुख, रामभाऊ आवारे सर प्रदेश कार्याध्यक्ष व प्रदेश प्रसिद्ध प्रमुख ,मधुकर महाराज जाधव पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष, शरद कैलास अढाव प्रदेश संघटक याचे सर्वाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून सर्व नागपूर टिमचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

Previous articleलासलगाव बाजार समिती सभापतीपदी बाळासाहेब क्षिरसागर तर उपसभापतीपदी गणेश डोमाडे बिनविरोध
Next articleसर्वसाधारण नागरिकांना सहाशे रुपयांत मिळणार वाळू. जनतेचे स्वप्न होणार साकार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here