
आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय
जागर हिंदुत्वाचा जोगवा आई भगवतीचा
युवा मराठा न्युज मालेगाव विभागीय कार्यालय – आंशुराज पाटिल व धुळे जिल्हा प्रतिनिधी दिपक जाधव
गुढीपाढवा हिंदु नववर्षाच्या पावन पर्वा निमित्ताने जय मातादी पद यात्रा समिती शिरपुर आयोजित आबा चौधरी व धिरज चौधरी खान्देश किंग शिरपुर सहकलाकार यांच्या सुश्राव्य मधुर वाणीतुन सप्तशृंगी निवासीनी आई भगवतीचे गितांना सुरवात झाली यावेळी कार्यक्रम स्थळी आबा चौधरी बोलत होते की जय माता दी पदयात्रा समिती ट्रस्ट शिरपूर आयोजित पायी यात्रेचा 90 वर्षांपासून आमचा वारसा आहे,,पंजोबा आजोबा वडील गावातील भक्तगण पहिले सुरवातीच्या चा काळात गाडी बैला सह दोघीकडून आपली शिदोरी सोबत पायी यात्रा करत असे,,
या 29 वर्षा पासून आई भगवतीच्या रथ ट्रॅक्टर वर बनवण्यात आला,, व त्या पासुन पायी यात्रा ही जोरात प्रसिद्ध झाली,, आता भक्तांसाठी ग गावोगावी ठिकठिकाणी भंडारा महाप्रसाद पाणि वाटप दानशुर दाते कडुन आयोजन होत असते,, लाखोंच्या संख्येने खान्देशातील भाविक पायी यात्रा ला येत असतात त्यांचे मनोरंजन व एक धर्म जागृती व आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आम्ही आई भगवतीचे भक्तीगिते निर्माण करत असतो ,,डोंगर हिरवागार, भाऊ मना सम्राट, माय तुनं माहेर बेटावद,, देविच्या आरत्या जोगवा ,, आमचे स्वरचित गीते बजरंग बॅड च्या संगित घेऊन डिजे, बॅण्ड गावोगावी घरोघरी लग्नसोहळा ही वाजतात अशी सुपरहिट देवीचे गिते ,, आबा चौधरी धिरज चौधरी खान्देश किंग ग्रुप या चैनल च्या माध्यमातून प्रसारित करत असतो,,
या मुळे गावोगावी घरोघरी एक धार्मिक वातावरण निर्मिती होत असते,,
या वर्षी ही शिरपूर चा मानाचा रथ दि, 30 मार्च श्रीराम नवमी ला बजरंग बॅण्ड शिरपूर सह हजारो भाविक पायी यात्रेसाठी सप्तश्रृंगी गडावर निघणार आहेत,, नरडाणा सोनगीर धुळे झोडगे दरेगाव मालेगाव दाभाडी आघार लखमापूर ब्राह्मणगाव ठेंगोडे लोहणेर विठेवाडी कळवण मार्गे दि, 4 एप्रिल चतुर्दशीला चावदस ला सप्तश्रृंगी गडावर,, पोहचु असा शिरपूर मानाचा रथाचा प्रवास राहील,, श्री राम नवमीच्या दिवशी शिरपुरचा मानाचा रथ सप्तशृंग गडाकडे मार्गस्थ होईल असे आबा चौधरी यांनी युवा मराठा न्युजचे आंशुराज पाटिल यांच्याशी बोलताना सांगितले तर यावेळी समस्त सकल हिंदु बांधव कार्यक्रम स्थळी बहुसंख्यने उपस्थित होते