Home नाशिक नाशकात ठाकरे गटातील गळतीनंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरेंची सभा

नाशकात ठाकरे गटातील गळतीनंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरेंची सभा

38
0

आशाताई बच्छाव

IMG-20230205-WA0015.jpg

नाशकात ठाकरे गटातील गळतीनंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरेंची सभा

भास्कर देवरे (उपसंपादक युवा मराठा न्यूज नेटवर्क)

ठाकरे गटाला नाशिकमध्ये गळती लागल्यानंतर युवा नेते आदित्य ठाकरे यांची पहिली सभा नाशिकमध्ये होणार आहे. येत्या सोमवारी आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असून ते नाशिकमध्ये हजेरी लावणार आहेत. ठाकरे गटातील अनेक स्थानिक नेते शिंदे गटात गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांची ही पहिली सभा असणार आहे. त्यामुळे आता युवा नेते यांच्या या सभेवर लक्ष लागून आहे. उद्या सोमवारी (दि. ६, फेब्रुवारी) आदित्य ठाकरे देवळाली गावात जाहीर सभा घेणार आहेत. नाशिकमधील शिवसेनेच्या गळतीनंतर त्यांची ही पहिली सभा असून ते या सभेत काय बोलणार. . ? त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक मधील शिवसेनेला पुन्हा बहर येईल का..? आणि त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात काय घडामोडी घडणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरेल.
सायंकाळी सहा वाजता नाशिक रोडच्या आनंद ऋषीजी शाळेमागील सुवर्ण सोसायटीच्या पटांगणात ही सभा होणार आहे. या सभेची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सह संपर्कप्रमुख आणि माजी जिल्हाध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. आदित्य ठाकरे हे देवळाली गावात सभा घेणार असून माजी नगरसेविका कै. सत्यभामा गाडेकर यांच्या घरी जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

*हेमंत गोडसे यांच्यावर करणार हल्लाबोल..?*

या आधी नाशिक दौऱ्यावर आलेल्या संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार ताशेरे ओढत हेमंत गोडसे यांचा चांगलाच समाचार घेतला होता. आगामी नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना हाच चेहरा आहे. हेमंत गोडसे चेहरा होता का असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला होता. त्यावर हेमंत गोडसे यांनी देखील प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फेरी पाहायला मिळाल्या. दरम्यान आता आदित्य ठाकरे हे उद्धव सेनेला गळती लागल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहे. ते देखील हेमंत गोडसे यांच्यावर जाहीर सभेतून हल्लाबोल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सभेच्या आयोजनासाठी बैठक घेण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यासोबतच जबाबदारीचे देखील वाटप करण्यात आले आहे. या सभेला माजी मंत्री बबन घोलप, माजी आमदार योगेश घोलप, उपनेते सुनील बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, गटनेते विलास शिंदे आदींची उपस्थिती राहणार आहे. दरम्यान शिवसेनेचे तरुण नेतृत्व आदित्य ठाकरे हे नाशिक मधील डॅमेज कंट्रोल साठी काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Previous articleव-हाणेत सुरु आहे बोगस व नित्कृष्ठ रस्त्याचे कामकाज !!
Next articleवंदे भारत सज्ज…! मुंबई ते शिर्डी प्रवास ५ तास ५५ मिनिटात.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here