Home मुंबई “सामनातील राऊत बंधूनी दिलेली जाहिरात चर्चेत! शिंदे गटाच्या वर्मी घाव.

“सामनातील राऊत बंधूनी दिलेली जाहिरात चर्चेत! शिंदे गटाच्या वर्मी घाव.

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20230122-WA0027.jpg

“सामनातील राऊत बंधूनी दिलेली जाहिरात चर्चेत! शिंदे गटाच्या वर्मी घाव.

भास्कर देवरे ( युवा मराठा न्युज नेटवर्क)

उद्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून त्यानिमित्ताने राऊत बंधूनी दिलेली सामनातील या वृत्तपत्रातील जाहिरात चर्चेचा विषय ठरतेय. या जाहिरातीतून राऊत बंधूनी शिंदे गटाच्या वर्मी घाव घातला आहे. 40 गद्दारांना गाडून पुन्हा उभे राहणार. तेव्हाच बाळासाहेब अभिवादन केल्याचे समाधान ठाकरेंना अभिवादन शिवसैनिकांना होईल, असे यात संजय – सुनील राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे राऊतांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला डिवचले आहे. या जाहिरातीची राजकीय वर्तुळात चर्चा होत असून
समाजमाध्यमांवर चांगलीच झळकत आहे.
उद्या सोमवार (दि.२३) बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. शिवसैनिकांसाठी मोठा दिवस आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आजही शिवसैनिक त्यांच्या विचारांवर चालत आहे. ठाकरेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त उद्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.
उद्याच्या जयंतीनिमित्त खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनी सामना या वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर जाहिरात दिली आहे. यामधून शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला असून या जाहिरातीची चर्चा रंगलीय.

जाहिरातीतील आशय

‘साहेब मी गद्दार नाही. गेलेल्या 40 गद्दारांना गाडून पुन्हा त्याच उमेदीने उभे राहू तेव्हाच तुम्हाला खर्या अर्थाने अभिवादन केले याचे समाधान आमच्या सारख्या शिवसैनिकांना होईल.’

Previous articleचेंबर फुटल्याने पसरले घाणीचे साम्राज्य अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे निवेदन
Next articleमुख्यमंत्रिपदासाठी कुणी काय केले, खुलासा करणार; राऊतांवर गोमूत्र टाकून स्वच्छ करा : केसरकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here