Home नाशिक चेंबर फुटल्याने पसरले घाणीचे साम्राज्य अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे निवेदन

चेंबर फुटल्याने पसरले घाणीचे साम्राज्य अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे निवेदन

174

आशाताई बच्छाव

IMG-20230122-WA0033.jpg

चेंबर फुटल्याने पसरले घाणीचे साम्राज्य अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे निवेदन

भास्कर देवरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

बागलाण तालुक्यातील सोमपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरात बंदिस्त गटारीचे चेंबर फुटल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही ठिकाणी चालणे अवघड होत आहे. तसेच या खराब पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना डास, मच्छर यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. काही ठिकाणी साथरोग पसरतील की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे. याच पार्श्वभूमीवर अन्याय अत्याचार निर्मूलन समिती राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र (दादा) जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गटारीचे त्वरित सुधारणा करावी अन्यथा याबाबत तीव्र प्रतिक्रिया ग्रामपंचायतीसमोर बघावयास मिळतील. यावेळी अन्याय अत्याचार निर्मूलन समिती बागलाण तालुकाध्यक्ष संदीप गांगुर्डे, शरद जगताप, विशाल चव्हाण, राजेंद्र लोंढे, तसेच इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleपुणे मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार, पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू
Next article“सामनातील राऊत बंधूनी दिलेली जाहिरात चर्चेत! शिंदे गटाच्या वर्मी घाव.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.