आशाताई बच्छाव
राष्ट्रीय पत्रकार संघ मराठवाडा अध्यक्षपदी श्री सय्यद नविद अंजुम यांची निवड झाल्याने शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर येथील साप्ताहिक ताजा हालात. व ताजा हालात न्यूज चॅनलचे संपादक श्री सय्यद नवीद अंजुम यांची राष्ट्रीय पत्रकार संघ (भारत ) मराठवाडा अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे चंद्रकांत गज्जलवार पत्रकार तथा लोकजाणीव न्यूज लाईव्ह चे संपादक यांच्यावतीने शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आले. यावेळी चंद्रकांत गज्जलवार पत्रकार तथा लोकजाणीव न्यूज लाईव्ह चॅनलचे संपादक, भीमराव भाटापुरकर जिल्हा कोषाध्यक्ष बसपा, पंडित वाघमारे वन्नाळीकर बसपा देगलूर विधानसभा महासचिव, भीमराव भास्करे, भीमराव दिपके पत्रकार, मारुती काळे घाटापुरकर, पंढरी सूर्यवंशी बिजलवाडीकर, पंढरी कांबळे येरगी, मारुती देगावकर पत्रकार आदी उपस्थित होते.