Home परभणी जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेत दोन दिवस अंशत: बदल

जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेत दोन दिवस अंशत: बदल

42
0

आशाताई बच्छाव

IMG-20221207-WA0038.jpg

जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेत दोन दिवस अंशत: बदल

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)

परभणी,  :- परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्गावर पेडगाव येथे मुस्लिम बांधवांच्या वार्षिक इज्तेमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील मार्गात उद्या बुधवारपासून दोन दिवस अंशत: बदल करण्यात आला आहे.
परभणी – पाथरी या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्यावरील वाहतूक इज्तेमा कार्यक्रमादरम्यान चालू राहिल्यास वाहतूक खोळंबण्याची व अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने परभणी – पाथरी या महामार्गावरील वाहतूक 7 ते 8 डिसेंबर या कालावधीसाठी पुढील प्रमाणे वळविण्यात आली आहे. या वाहतूक व्यवस्थेत बदल करुन सेलूकडून मानवतरोड मार्गे येणारी जड वाहने कोल्हापाटी (मानवतरोड) येथून मानवत – पोखर्णी फाटा – पाथरी – उमरी मार्गे परभणीकडे वळविण्यात आली आहे.

तसेच गंगाखेड रोड – वसमत रोड – जिंतूर रोडवरुन येणारी वाहने पेडगाव मार्गे न जाता ती गंगाखेड रोडवरील उमरी फाटा येथून पाथरीकडे वळविण्यात आली आहे. मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ख) अन्वये सदर आदेश देत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here