आशाताई बच्छाव
परमपूजनीय गोळवलकर गुरुजी माध्यमिक विदयालयात संविधान दिन उत्साहात साजरा.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर – परमपूजनीय गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर व पूजनीय गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमेच्या पुजनाने झाली.
या प्रसंगी विद्यालयातील दहावी (अ) मधील विद्यार्थ्यांनी कु. स्नेहा बोंडगे या विद्यार्थिनीने इंग्रजीतून संविधान विषयी माहिती सांगितली तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले. यानंतर प्रमुख वक्ते विद्यालयातील शिक्षक योगेश वझलवार यांनी संविधान दिनानिमित्त सविस्तर माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत वाघमारे यांनी कार्यक्रमाचा समारोप करते वेळेस २६ नोव्हेंबर मुंबई हल्ल्याच्या आठवणी सांगत शहीदांना श्रध्दांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश चव्हाण यांनी केले कार्यक्रमास विद्यालयातील जेष्ठ शिक्षक सुरेश कुलकर्णी तपोवनकर व सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.