Home पुणे पुणे जिल्ह्यात २४ लाखाची चोरी करणारी टोळी जेरबंद

पुणे जिल्ह्यात २४ लाखाची चोरी करणारी टोळी जेरबंद

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20221025-WA0075.jpg

युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा ब्युरो चीफ श्री प्रशांत नागणे            यवत पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई कुरियर कंपनीचे २४ लाख रु जबरी चोरी करून पळून गेलेली टोळी अखेर जेरबंद.
दि ६/१०/२०२२ रोजी यवत पोलीस स्टेशन हद्दीत एक इसम खाजगी कंपनीचे कुरियर घेऊन पुणे कडे एस टी बस ने प्रवास करीत होता सदर इसमावर काही लोकांनी पाळत ठेवत एस टी मध्ये सहप्रवासी म्हणून बसले . गाडी यवत येथे येताच २ संशयित इसम उठून सदरील कुरियर बॉय ला तु मुलींना का छेडतो असे ओरडून त्याला मारहाण करीत त्याचे ताब्यात असलेले कुरियर ची बॅग घेऊन गेले. सदर कुरियर बॉय याने यवत पोलीस स्टेशन ला त्या अज्ञात इसमा विरुद्ध तक्रार दिली . सदर बॅग मध्ये रोख रक्कम २४ लाख रु असल्याचे कुरियर कंपनीचे मालक यांनी पोलिसांना सांगितले. सदरील गुन्हा यवत पोलीस स्टेशन गु र न ८२४/२०२२ भा द वि का कलम ३९२, ३४ नुसार नोंदवण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास करिता स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशिष्ठ पथक नेमण्यात आले होते.
सलगच्या १५ दिवस केलेल्या तपासात अखेर स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले . त्यानुसार आज दि २४/१०/२०२२ रोजी खालील प्रमाणे संशयित इसम ताब्यात घेतले.१) ओंकार दिनकर जाधव वय २४वर्षे रा अकोळनेर ता नगर जि अहमदनगर
२) अनिकेत गोरख उकांडे वय २३ वर्षे रा अकोळनेर ता नगर जि अहमदनगर
३) किरण रामदास गदादे वय २३ वर्षे रा तांदळी ता शिरूर जि पुणे
४) तेजस मोहन दुर्गे वय २० वर्षे रा म्हाडा कॉलनी बारामती ता बारामती जि पुणे
५) गणेश बाळासो कोळेकर वय २० वर्षे रा तावरे वस्ती सांगवी ता बारामती जि पुणे सदरील गुन्हा त्यांचा आणखी एक साथीदार नामे प्रेमराज उत्तम ढमढेरे रा तांदळी ता शिरूर जि पुणे याच्या मदतीने केला असल्याचे सांगितले वरील क्र १ ते ५ आरोपी ताब्यात घेतले असून प्रेमराज उत्तम ढमढेरे रा तांदळी ता शिरूर जि पुणे हा पोलिसांची चाहूल लागताच फरार झाला आहे. सदरील १ ते ५ आरोपी यांना पुढील तपास कामी यवत पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहेत.
सदरील कारवाई ही मा पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख सो
अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते सो उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस सो स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक शेळके सो यांच्या मार्गदर्शनाखाली
पो स ई शिवाजी ननवरे
पो हवा सचिन घाडगे
पो हवा विजय कांचन
पो हवा अजित भुजबळ
पो हवा अजय घुले
पो हवा राजू मोमीन
पो हवा दत्तात्रय तांबे
पो ना बाळासाहेब खडके
पो कॉ धिरज जाधव
पो कॉ दगडू विरकर यांनी केली आहे.

Previous articleकौतुकस्पद याराना यारा तेरी यारी को मैने तो खुदा माना दोस्ताना सलामत रहे हमारा 
Next articleदिवाळी निमित्त शासनाच्या वतीने उंद्री प.दे. येथील स्वस्त धान्य दुकानात आनंदाचा शिधा किटचे वाटप.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here