Home नांदेड अति‍वृष्‍टी अनुदानाची रक्‍कम जिल्‍हयातील सर्व शेतक-यांचे खात्‍यात जमा.

अति‍वृष्‍टी अनुदानाची रक्‍कम जिल्‍हयातील सर्व शेतक-यांचे खात्‍यात जमा.

51
0

आशाताई बच्छाव

IMG-20221019-WA0005.jpg

अति‍वृष्‍टी अनुदानाची रक्‍कम जिल्‍हयातील सर्व शेतक-यांचे खात्‍यात जमा.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

महाराष्‍ट्र शासनाकडुन राज्‍यातील अतिवृष्‍टी बाधीत शेतक-यांना माहे जुन 2022 ते ऑगस्‍ट 2022 या कालावधीत अतिवृष्‍टी झाल्‍यामु़ळे जिल्‍हयातील शेतकरी बांधवांना अनुदान रक्‍कमेचे अर्थसहाय्य देण्‍यात आले आहे. नांदेड जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेस अनुदानाच्‍या रक्‍कमा रु.686.45 कोटी प्राप्‍त झाले असुन बँकेच्‍या अधिकारी/कर्मचा-यांनी रात्र-दिवस बसुन शेतक-यांना दिपावली सणाच्‍या पुर्वी अनुदानाच्‍या रक्‍कमा मिळणेसाठी परिश्रम घेतले असुन सदरील रक्‍कमा शेतक-यांच्‍या खात्‍यात जमा करुन आज दि.17.10.2022 रोजी पासुन जिल्‍हयातील 60 शाखेमधुन अनुदानाच्‍या रक्‍कमा दिपावली सणाच्‍या पुर्वी शेतक-यांना वाटपास सुरुवात केलेली आहे. बँकेने रुपे डेबीट कार्ड 2.00 लाख खातेदारांना वाटप करण्‍यात आले असुन ज्‍या शेतक-यांकडे रुपे डेबीट कार्ड (ए.टी.एम.कार्ड) आहे अश्‍या शेतक-यांनी ए.टी.एम. मधुन रक्‍कमा उचल करावी व ज्‍या शेतक-यांकडे रुपे डेबीट कार्ड (ए.टी.एम.कार्ड) नाहीत अश्‍या शेतक-यांना बँकेने ठरवुन दिलेल्‍या Z ते A गावांच्‍या क्रमवारीनुसार बँकेतुन अनुदान वाटप करण्‍यात येत असुन संबंधीत शाखेशी संपर्क साधुन शाखेने दिलेल्‍या कार्यक्रमानुसार अनुदानाची रक्‍कम उचल करावी. सदर अतिवृष्‍टी अनुदान वाटपाचे वेळी बॅंकेच्‍या शाखेत होणारी गर्दी विचारात घेता, शाखेतील अनुदान वाटप शांततेत पार पाडण्‍यासाठी शेतकरी बांधवांनी बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन बँकेचे अध्‍यक्ष श्री वसंतराव बळवंतरावजी चव्‍हाण, उपाध्‍यक्ष श्री हरीहरराव वि.भोसीकर, सर्व संचालक मंडळाचे सदस्‍य व बँकेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ.अजय कदम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here