Home कोल्हापूर वडगावात वीज कोसळल्याने नागरिकांमध्ये घबराट

वडगावात वीज कोसळल्याने नागरिकांमध्ये घबराट

92
0

आशाताई बच्छाव

IMG-20221011-WA0043.jpg

वडगावात वीज कोसळल्याने नागरिकांमध्ये घबराट

पेठ वडगाव राहुल शिंदे:पेठवडगांव परिसरात विजेचा कडकडाटसह जोरदार पाऊस बरसला.याच दरम्यान लाटवडे रोडवर फटाक्‍यांच्या जुन्या शेडवर वीज पडून जमीनदोस्त झाली.काही घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या.वडगाव मध्ये बंडूलाल शिकलगार यांचे फटाक्याचे जुने गोडाऊन रिकामे होते.सकाळी सव्वासातच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला होता.त्यावेळेस बंडूलाल शिकलगारच्या जुन्या शेडवर वीज कोसळली.श्रीराम नगर येथे विजेचा कडकडाटसह पाऊस पडत होता ते पाहण्यासाठी काही नागरिक घराबाहेर आले त्याच दरम्यान आभाळातून एक आगीचा लोळ जमिनीच्या दिशेने येताना दिसला.व क्षणार्धात सगळीकडे आगीचे व धुराचे मोठे लोळ दिसू लागले.खूप मोठा आवाज झाला खोलीचे पत्रे व विटा वरती आकाशात उडताना काही नागरिकांना दिसून आले .या मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.महसूल विभागाने घटनास्थळी पंचनामा केला.दरम्यान शेडमध्ये फटाक्यांचे साहित्य होते की नव्हते याबाबत पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here