आशाताई बच्छाव
पंतप्रधान आवास योजनेच्या प्रपत्र ब मधील अपात्र लाभार्थी धारकांना चौकशी करून घरकुलाचा लाभ द्या
गावकऱ्यांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन
युवा मराठा वेब न्युज चॅनल प्रतिनिधी
रविंद्र शिरस्कार,संग्रामपूर
संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर या गावांमध्ये सन 2020 मध्ये एकूण 513 लोकांची प्रपत्र ब ची यादी पात्र असून ग्रामपंचायत कार्यालयात होणाऱ्या मासिक सभेमध्ये दिनांक 17/12/ 2020 नुसार काही पात्र लाभार्थी यांना अपात्र ठरवून त्यांची कायमस्वरूपी नावे वगळण्यात आलेले आहेत आणि तसा ठराव मान्य करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करून पात्र लाभार्थींना कायमस्वरूपी वगळण्यात आले आहे
त्याकरिता बावनबीर येथील प्रणव विठ्ठल बाजारे व इतर गावातील 30 लोकांच्या सह्या करून गट विकास अधिकारी पंचायत समिती संग्रामपूर यांना निवेदन देण्यात आले की दिनांक 17/12 /2020 चे मासिक सभा तसेच दिनांक 30/ 1/ 2019 ची मासिक सभेची इतिवृत्त नोंदवही व सभेची हजेरी रजिस्टर सभा नोटीस बुक इत्यादीची चौकशी होऊन सदर पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा तसेच या पात्र लाभार्थ्यांसाठी कमी पडणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची हमी देऊन निवेदन सादर केले
यावेळी निवेदनात प्रणव बाजारे श्रीकृष्ण फुलकर, सुधाकर देशमुख, माधव हागे, ज्ञानदेव ठाकरे, रामभाऊ शित्रे, सुनीता बाजारे,धनराज बकाल, शेख महेमूद, सादिक अन्सार तसेच एकूण 30 लोकांच्या सह्या आहेत.