Home पालघर शेतकऱ्यांनी पशुधनांची काळजी घ्यावी लम्पी त्वचा रोग आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुपालकाना आवाहन

शेतकऱ्यांनी पशुधनांची काळजी घ्यावी लम्पी त्वचा रोग आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुपालकाना आवाहन

110
0

आशाताई बच्छाव

IMG-20220912-WA0037.jpg

शेतकऱ्यांनी पशुधनांची काळजी घ्यावी

लम्पी त्वचा रोग आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुपालकाना आवाहन

पालघर,(वैभव पाटील)
वाडा तालुक्यातील दिनकर पाडा,कोंढले गावातील एका एका पशुपालक यांच्या तबेल्यातील एका कांकरेज जातीच्या गाईमध्ये लम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे रोग निदान विभाग,पुणे यांनी कळविले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरू नये,यासाठी पशुपालकानी काळजी घ्यावी.असे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले आहे आणि या आजाराने जनावरे दगावण्याचे प्रमाण 1 ते 2 % असल्याने पशुपालक यांनी घाबरून जाऊ नये असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.
लंपी त्वचा या रोगात जनावराना खूप ताप येणे,चारा-पाणी कमी करणे,नाक व डोळ्यातून चिकट स्त्राव येणे,जनावराच्या शरीरावर गाठी येतात. पायाला सूज येवून जनावर लंगडते,दूधाळ जनावराचे दुग्ध उत्पादन कमी होते . अशी साधारण लक्षणे दिसून येतात.
बाधित जनावर इतर निरोगी जनवारांपासून वेगळे करून त्याची खबर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास देवून त्यावर उपचार करून घ्यावेत. या रोगाचा प्रसार डास,माशा,चिलटे व गोचीड-गोमाशा आदीमार्फत होत असल्याने गोठ्याची व जनावरांची स्वच्छता राखावी. गोठ्यात व जनावरांच्या बाह्य अंगावर कीटक नाशकाची फवारणी करावी .
. या रोगाचीलक्षणे,उपचार, प्रतिबंधात्मक उपाय व पशुपालक यांनी घ्यावयाची काळजी यावर पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद पालघरचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व सर्व गटातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्यामार्फत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. रोग नियंत्रणासाठी गोट पोक्स् लसीकरण करणे आवश्यक आहे. जिल्ह्याची पशुधन संख्या जवळपास 3 लाख पर्यन्त आहे, हा रोग जास्त प्रमाणात बळावल्यास जिल्हा परिषद सेस फंडातून जनावरांसाठी पुरेशी लस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. बाधित गावापासून 5 किलोमीटरच्या परिसरातील येणाऱ्या सर्व गावातील तीन महिन्यावरील गाय व म्हैस वर्गातील जनावराना नजीकच्या पशुवैद्यकच्या सल्ल्याने लसीकरण करावे. वाडा तालुक्यातील खालील कोंढले,मांगाठणे,सापरोंडे,म्हसवल व उसर या 5 किलोमीटर परिसरातील गावांमध्ये जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा पसुसंवर्धन अधिकारी यांच्या संनियंत्रनाखाली व मार्गदर्शनाखाली लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. बाधित जनावराना औषधोपचार करून घ्यावे. रोग प्रादुर्भाव झाल्यास जनावरांची खरेदी-विक्री थांबवावी, जनावरांचे मेळावे भरवू नये,गुजरात राज्यात काही जिल्ह्यात या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्याने गुजरात राज्यातून गाई-म्हशी खरेदी व वाहतूक बंद करावी.असे जिल्हा पाशुसंवर्धन उपायुक्त यांनी सांगितले. प्राण्यामधील संक्रमक आणि सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम,2009 अन्वये लंपी त्वचा रोगाच्या प्रादुर्भावांची माहिती पशुपालक,इतर
कोणतीव्यक्ति,शासानेतर संस्था,सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत यांनी तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस,प्रशासनास देणे बंधनकारक असल्याचेही सांगितले.

Previous articleशिक्षकाचे थेट मुख्यमंत्र्याना खुले पत्र, अशैक्षनिक कामे थोपवल्याने केली नाराजी व्यक्त
Next articleयेलदरी पाणी कोणत्याही क्षणी सोडणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here