Home नाशिक वनसगाव येथील गणेश जोशी गुरु ज्योतिष भूषण पुरस्काराने सन्मानित

वनसगाव येथील गणेश जोशी गुरु ज्योतिष भूषण पुरस्काराने सन्मानित

128

आशाताई बच्छाव

1001578043.jpg

वनसगाव येथील गणेश जोशी गुरु ज्योतिष भूषण पुरस्काराने सन्मानित

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

वनसगाव तालुका निफाड येथील पौराहित्य श्री गणेश शरद जोशी (गुरु) यांना नासिक येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशनात दाते पंचांग कर्ते श्री मोहन शास्त्री दाते यांच्या शुभहस्ते ज्योतिष भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठान नाशिक यांच्यातर्फे राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन भूषणम् पुरस्कार सोहळा पदवीदान समारंभ उत्साहात झाला. नाशिक येथे झालेल्या अधिवेशनामध्ये दाते पंचांगकर्ते श्री.मोहनशास्री दाते यांना पंचांग भुषणम् पुरस्कार ज्यो हर्षद महाजन पं भूषण महाजन यांच्या हस्ते देण्यात आला. वेदमुर्ती राजाराम खोचे व वेदमूर्ती दिनेश गायधनी यांना वेदभूषणम्, ज्यो.भुषण पाटील व ज्यो उदय कुलकर्णी यांना ज्योतिषभूषणम् ,पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी पदवीदान समारंभ झाला. 28 विद्यार्थ्यांना विशेष ज्योतिषभुषण पदवी देवुन सन्मानित करण्यात आले.
ज्योतिष भूषण पदवीधारक पुढील प्रमाणे–
सौ शारदा राजेश भामरे, प्रशांत, सुरेशराव पैठणे,सौ प्रियंका तषार जोशी नाशिक,कैवल्य अजय दिकषीत, प्रकाश चंद्रकांत संतसौ हेमा जयेश जोशी, सौं माधुरी विनायक डगवार ,सौं सुलभा प्रदीप जाधव , निवृत्ती चिंतामण पवार ,डाँ निलीमा उमेश पाटील ,वैभव राजेंद्र शुक्ल,पुजा शिवप्रसाद फडणीस,सौ पुजा अजित भोसले, रणजितसिंह वसंतराव घाटगे ,सौं स्वरुपा रामेश्वर परांजपे ,रेश्मा संतोष खिरिड,कोमल दिवाकर जोशी शिरीष रामचंद्र पारायणे ,आनंद रामचंद्र रामदासी , सुनिल मधुकरराव दडके , रंगराव ईश्वरा माळी ,सौं कमल सोमनाथ भटाटे, विनायक रघुनाथ महाशब्दे, सौं लीना मंगेश जाधव ,प्रदिप चंद्रकांत गिरीधर ,पवन रमेश विसपुते ,गणेश(अशोक) शरद जोशी वनसगाव तालुका निफाड,सौ. वैशाली पाटील ,श्री प्रशांत पैठणे व सौ प्रियंका जोशी यांना ज्योतीर्विद्यावाचस्पती या पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.त्याच बरोबर 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ज्योतिष प्रबोध ज्योतिष विशारद, ज्योतिष प्रवीण, कृष्णमूर्ती विशारद अशा पदव्या देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अधिवेशनात ज्योतिषाचार्य नासिक पंचांग कर्ते हर्षद महाजन, उदय कुलकर्णी, भूषण पाटील, प्रकाश संत, प्रथमेश दीक्षित आदी मान्यवरांची व्याख्याने झाली, सूत्रसंचालन गीता सगरे यांनी केले परिचय पद्मश्री पेटकर, दिपाली निकम, यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोषाध्यक्ष किरण क्षत्रिय, भूषण पाटील , प्रशांत पैठणे ,नूतन रहाळकर, सारिका ठोंबरे, कैवल्य दीक्षित आधी सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले.

Previous articleकेडगावात पत्रकारावर जीवघेणा हल्ला
Next articleग्यानबा तुकाराम.. आश्वासनातले किती झाले काम..? असे म्हणत जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांनी विचारला सत्ताधार्‍यांना सवाल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.