Home नांदेड यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नांदेड विभागीय केंद्रामार्फत विभागीय युवक महोत्सवाचे आयोजन.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नांदेड विभागीय केंद्रामार्फत विभागीय युवक महोत्सवाचे आयोजन.

120
0

आशाताई बच्छाव

IMG-20220912-WA0009.jpg

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नांदेड विभागीय केंद्रामार्फत विभागीय युवक महोत्सवाचे आयोजन.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेशित विद्याथ्र्यांसाठी विभागीय केंद्रांच्या स्तरावर विभागीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या शैक्षणिक वर्षात विभागीय केंद्र, नांदेड यांचेमार्फत शनिवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी विभागीय केंद्र, नांदेड कार्यालयात विभागीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या युवक महोत्सवात नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी जिल्ह्यांमधील अभ्यासकेंद्रावर प्रवेशित विद्यार्थ्यांनी संख्येने सहभागी होऊन आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा अविष्कार करावा. ज्या विद्यार्थ्याचे वय २५ पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना खालील कलाप्रकारात सहभाग नोंदविता येईल.

या युवक महोत्सवात विविध कलागुणांचा अविष्कार होणार आहे. शास्त्रीय गायन: भारतीय / कर्नाटकी, शास्त्रीय वाद्य संगीत (स्वरवाद्य), शास्त्रीय वाद्य संगीत
. नृत्य विभाग(तालवाद्य), पाश्चिमात्य समुहगान, लोकसंगीत वाद्यवृंद. द लोक / आदिवासी नृत्य, शास्त्रीय नृत्य (भारतीय). वाडमयिन कला विभाग . रंगमंचीय कला विभाग
ललितकला विभाग: प्रश्नमंजुषा (Quiz), वकृत्व स्पर्धा (Elocution), वादविवाद स्पर्धा (Debate). : एकांकिका (One Act Play), प्रहसन (Skit ), मुकनाट्य (Mime).नकला (Mimicry)स्थळचित्र, पोस्टर मेकिंग, चिकटकला, रांगोळी, स्थळ छायाचित्रण, मातोकला.

व्यंगचित्रे युवक महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नाशिक येथे होणाऱ्या केंद्रीय युवक महोत्सवामध्ये आपली कला सादर करता येणार आहे. जास्तीत जास्त विद्याथ्र्यांनी युवक महोत्सवात सहभाग नोंदवावा असे आवाहन नांदेड विभागीय केंद्रातील श्री. चंद्रकांत सुरेश पवार, सहायक कुलसचिव यांनी केलेले आहे.

Previous articleपायरपाडा येथील महिला पुरात गेली वाहून
Next articleदेगलूर नगरीचे संतोष मंनधरणे यांना महात्मा ज्योतिबा फुले २०२२ जिल्हास्तरीय शिक्षण पुरस्कार प्रधान.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here