Home नांदेड देगलूर नगरीचे संतोष मंनधरणे यांना महात्मा ज्योतिबा फुले २०२२ जिल्हास्तरीय शिक्षण पुरस्कार...

देगलूर नगरीचे संतोष मंनधरणे यांना महात्मा ज्योतिबा फुले २०२२ जिल्हास्तरीय शिक्षण पुरस्कार प्रधान.

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20220911-WA0022.jpg

देगलूर नगरीचे संतोष मंनधरणे यांना महात्मा ज्योतिबा फुले २०२२ जिल्हास्तरीय शिक्षण पुरस्कार प्रधान.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

देगलूर:देगलूर शहरातील विद्यानिकेतन प्राथमिक शाळा देगलूर येथील प्राथमिक शिक्षक संतोष मंनधरणे यांना महात्मा ज्योतिबा फुले २०२२ जिल्हास्तरीय शिक्षण पुरस्कार प्रधान.
महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद ही प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर कार्य करणा-या स्वाभिमानी शिक्षकांची नोंदणीकृत संघटना असुन ती विद्यार्थी, शिक्षक व समाज या त्रिमीती सुत्रावर कार्य करते. सद्यस्थितीत शिक्षकांच्या अनेक संघटना असतानाही शिक्षकाचा व शिक्षणाचा प्रश्न मात्र सुटलेला नाही भुमिका
शिक्षण क्षेत्रात काम करणारे बहुतांश शिक्षक हे अजुनही येणा-या अडचणींवर मात करुन विद्यार्थ्यांना सर्वांगीन शिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांच्या प्रश्नांची सोडवणुक मात्र निःस्वार्थपणे कोणीही करताना दिसत नाही. बदललेल्या शैक्षणिक, सामाजिक, राजकिय व आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षक व
समाजात एक प्रकारची दरी निर्माण झाली आहे. आणि विद्यार्थी-शिक्षक नात्यात तर प्रचंड
घसरण झालेली आहे.
अशाना महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेची विनंती आहे. जात, धर्म, पंथ, पक्ष, याच्या पलीकडे जावुन फक्त आणि फक्त शिक्षक आणि शिक्षकांचे सर्वांगीन प्रश्न सोबतच विद्यार्थी, समाज आणि राष्ट्राचे हित ही संघटना कार्यकर्ते असेच एक होतकरू शिक्षक संतोष मंनधरणे यांनी त्यांच्या शैक्षणिकदृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या त्यांचे कार्य पाहून महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक पुरस्कार 2022 त्यांना देण्यात आले आहे या पुरस्कारामुळे देगलूर परिसरातील त्यांच्या सहकार्य मित्रमंडळी व देगलूर परिसरातील नागरिक यांनी त्यांना शुभेच्छाचा वर्षाव केला आहे भावी जीवनात अशीच शिक्षण क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात त अलोकिक कार्य करावे अशी शुभेच्छा दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here