• Home
  • गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दोंडाईचा पोलिसांनी पकडल्या तीन चोरांकडून दहा मोटरसायकली…

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दोंडाईचा पोलिसांनी पकडल्या तीन चोरांकडून दहा मोटरसायकली…

आशाताई बच्छाव

IMG-20220901-WA0013.jpg

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दोंडाईचा पोलिसांनी पकडल्या तीन चोरांकडून दहा मोटरसायकली…
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी = सागर (गणेश) कांदळकर
जुन्या अंदाजीत वाजवी चार लाख किमंतीच्या दहा मोटरसायकली जप्त

आरोपींमध्ये एक दोंंडाईचा व दोन मालपूर येथील तरूणांचा समावेश

दोंंडाईचा येथे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दोंंडाईचा पोलीसांनी जनतेला ज्यांचा जान व माल पैकी फक्त मोटरसायकली चोरी झाल्या आहेत. अशा तक्रारदारांच्या अंदाजीत चार लाख रूपये किमंतीच्या दहा मोटरसायकली तीन चोरांकडून हस्तगत केल्या आहेत. याबाबत संशयित चोरांकडून आणखी चोरी झालेल्या मोटरसायकलींची माहिती मिळण्याची शक्यता असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोंंडाईचा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री दुर्गेशजी तिवारी, गुन्हेगार गोपनीय शाखेचे ए.एस.आय.राजू दुसाने,हे.काँ.संदीप कदम,पोलीस नाईक प्रेमराज पाटील, पोलीस शिपाई योगेश पाटील, अनिल धनगर, हिरालाल सुर्यवंशी, वाहक-मंगाले आदींनी गोपनीय पद्धतीने तपास लावून संशयित आरोपी १)राहुल मोतीलाल पवार, राहणार-गोपालपुरा-दोंंडाईचा,२)जयेश संजय धनगर, राहणार-मालपूर ३)कुशाल परमेश्वर गोसावी, राहणार-मालपूर आदींना मुद्देमाल- चोरीच्या दहा मोटरसायकली सह ताब्यात घेत कार्यवाही केली आहे.

anews Banner

Leave A Comment