Home गडचिरोली मुरुमगाव येथील धान्य घोटाळ्याची चौकशी करा – रोशन कवाडकर

मुरुमगाव येथील धान्य घोटाळ्याची चौकशी करा – रोशन कवाडकर

75
0

आशाताई बच्छाव

IMG-20220830-WA0029.jpg

मुरुमगाव येथील धान्य घोटाळ्याची चौकशी करा – रोशन कवाडकर

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत हजारो क्विंटल धान्याचा घोटाळा म्हणजे अंदाजे दोन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला असल्याचे दिसून येत आहे. मुरुमगाव धान्य खरेदी केंद्रामध्ये सुरसुंडी सह जवळपास 17 गावांचा समाविष्ट आहे. खरेदी केंद्रात सभासद शेतकऱ्यांचे खरीप हंगामात 27658 क्विंटल धान्याची खरेदी झाली, तर रब्बी हंगामात 6010 क्विंटल धान्य खरेदी करण्यात आले. त्यापैकी खरिपातील 19,640 क्विंटल धान्याचे डिओ उचल झालेले आहेत व उर्वरित 8018.15 क्‍विंटल खरिपाचे धान शिल्लक दिसून आले आहे. रब्बीचे 4150 क्विंटल उचल होऊन 1860.8 क्विंटल शिल्लक असल्याचे दस्ता-ऐवजांवरून दिसून येत आहे. मात्र प्रत्यक्षात अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती गडचिरोली व संबंधित गावातील प्रतिष्ठित नागरिक व इतरांच्या समवेत गोदामाची पाहणी केली असता गोदामात धान्य दिसून आले नाही व गोदाम हे रिकामे होते.
सन 2021-22 मध्ये 787 सभासदांचे सातबारा ऑनलाइन करण्यात आले होते. त्यापैकी 734 शेतकऱ्यांचे लाट पाडण्यात आले व सर्व सभासद शेतकर्‍यांचे धान्य खरेदी करून त्यांचे बिल तयार करून सदर बिलाची उचल सुद्धा करण्यात आली. मात्र काही शेतकऱ्यांचे पैसे अद्यापही मिळाले नसल्याचे दिसून येत आहे. खरीप व रब्बी मिळून 9878.95 क्विंटल धान्याचा तुटवडा सरासरी अंदाजे दोन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. याबाबत उपप्रादेशिक व्यवस्थापक डी.एम. चौधरी यांच्याशी संपर्क करून विचारणा केली असता सदर भ्रष्टाचार झाल्याचे मान्य करून याबाबत सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ करताना दिसून आले. यावरून सदर भ्रष्टाचारात त्यांचा सुद्धा सहभाग असल्याचे नाकारता येत नाही. तसेच व्यवस्थापक यांच्या संगमताने भ्रष्टाचार करून अमाप संपत्ती सुद्धा जमा केल्याचे दिसून येत आहे. सदर भ्रष्टाचारात वरिष्ठ अधिकारी यांचा सुद्धा सहभाग असल्याचे नाकारता येत नाही. तसेच उपप्रादेशिक कार्यालय धानोरा अंतर्गत इतर 13 केंद्रात सुद्धा भ्रष्टाचार झाले असल्याचे संशय येत आहे. तरी याबाबत संबंधित अधिकार्‍यांची व केंद्रप्रमुख यांची तसेच 13 केंद्राची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती गडचिरोलीचे जिल्हा उपाध्यक्ष रोशन कावडकर यांनी केली आहे.

Previous articleपर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सर्वाधिक प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी
Next articleजिनियस स्कूल मध्ये अटल टिकरिंग लॅबचे उद्घाटन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here