Home गडचिरोली केंद्र सरकारचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीकडून निषेध

केंद्र सरकारचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीकडून निषेध

72
0

आशाताई बच्छाव

IMG-20220829-WA0040.jpg

केंद्र सरकारचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीकडून निषेध

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
बिलकिस वानोच्या बलात्काऱ्यांनी गुजरात सरकारने अमृतममहोत्सवी स्वातंत्र्यदिनी सुटका केली असुन त्यांना पुन्हा गजाआड करण्यात यावे या मागणीसाठी स्थानिक इंदीरा गांधी चौक गडचिरोली येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीकडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
२००२ मध्ये गुजरात जो नरसंहार झाला त्यापैकी बिलकिस वानो एक शिकार असुन तिच्यावर ११ जणांनी सामूहिक बलात्कार केला. तिच्या तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा खुन कय्न अवघे कुटुंब संपवीले.परंतु हिम्मत न हारता बिलकिस वानोने प्रदिर्घ न्यायालयीन लढा दिला. मुंबईमध्ये विशेष सीबीआय न्यायालय मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बिलकिसला न्याय मिळाला असे वाटत होते. परंतु देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाल ‍किल्यावय्न केलेल्या भाषणात महिलांच्या सन्मानाच्या घोषणा सायंकाळ पर्यंत हवेतच विरळून गेल्या आणि गुजरात सरकाने बिलकिस वानोच्या ११ बलात्काऱ्यांची नियमबाहृय सुटका केली. हे कृत्य केवळ असंविधानिकच नाही तर मानवतेला काळीमा फासणारे असुन न्यायीक व्यवस्थेच्या चिंधळया उडवणारे आहे.
बलात्काऱ्यांची सुटका करण्याची नीयमांमध्ये कुठलीही तरतुद नसतांना गुजरात सरकारने हा निर्णय घेतला या संदर्भात केंद्र सरकारने लक्ष घालावे अशी मागणी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
यावेळी विभागीय महीला अध्यक्षा शाहीन भाभी हकीम, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, जिल्हाउपाध्यक्ष फहीमभाई काजी, जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर, तालुका अध्यक्ष विवक बाबनवाडे, शहर अध्यक्ष मिनल चिमुरकर, तालुका महीला अध्यक्ष निता सुरेश बोबाटे, शहर कार्याध्यक्ष कपील बागडे, आरती कोल्हे, संध्या उईके, सुवर्णा पवार, मनीषा खेवले, ममता चिलबुले, अनीता कोलते, अज्जू पठाण, बेबीताई लाभान, चेतना मेश्राम आदी उपस्थीत होते.

Previous articleकेंद्र सरकारचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीकडून निषेध
Next articleवरूणजी सरदेसाई साहेब युवासेना सचिव तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्य मा.रूपेश दादा कदम यांचे गडचिरोली जिल्ह्यात हार्दिक स्वागत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here