Home मुंबई प्रविण तरडे यांचा सोशल मीडियावर पालकांना मोलाचा सल्ला 🛑

प्रविण तरडे यांचा सोशल मीडियावर पालकांना मोलाचा सल्ला 🛑

124
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 प्रविण तरडे यांचा सोशल मीडियावर पालकांना मोलाचा सल्ला 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕ ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमाचे दिग्दर्शक प्रविण तरडे आपल्या सिनेमांमुळे आणि वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. प्रविण तरडे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवर पालकांना मोलाचा सल्ला दिला आहे.
पण त्यापूर्वी प्रविण तरडेंनी याची सुरूवात स्वतःपासून केली आहे.  फेसबुकवर प्रविण तरडेंनी आपल्या मुलासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये प्रविण तरडे आणि त्यांचा मुलगा सिंहगड किल्ल्यावर बसलेले आहेत. यावेळी प्रविण तरडे मुलाला लेखक रणजित देसाई यांची ‘श्रीमान योगी’ ही कादंबरी वाचून दाखवत आहे.  शिवाजी महाराजांचा इतिहास हा देशातील प्रत्येकानेच जाणून घ्यायला हवा. यासाठी पालकांनी आपल्या मुलांसाठी खास प्रयत्न करायला हवे. मुलांना आपण ट्रिपला घेऊन जातोच.
पण यावेळी आपण त्यांना महाराष्ट्रातला इतिहास जवळून अनुभवण्यासाठी गडकिल्ल्यांवर नेलं तर त्याचा फायदा सर्वाधिक होईल. अशा आशयाची पोस्ट केली आहे.  प्रविण तरडेंच्या पोस्टमध्ये काय म्हटलंय? मुलांना ट्रिपला “ थंड हवेच्या “ ठिकाणी जरूर न्या .. पण आपल्या बापजाद्यांनी जिथं त्यांचं “गरम रक्त”सांडलं त्या गडकिल्ल्यांवर न्यायला विसरू नका .. तिथं बसून त्यांना शिवचरित्र वाचून दाखवा ..

आजची संध्याकाळ
सिंहगडावर … मुलांना ट्रिपला “ थंड हवेच्या “ ठिकाणी जरूर न्या .. पण आपल्या बापजाद्यांनी जिथं त्यांचं “गरम रक्त”सांडलं त्या…

या पोस्टला नेटिझन्सनी चांगला प्रतिसाद दिला आहे. २३ हजाराहून अधिक लोकांनी ही पोस्ट पाहिली असून १.२ हजार लोकांनी या पोस्टला शेअर केलं आहे. तसेच शिवप्रेमी आणि प्रेक्षकांनी यावर कमेंटकरत उत्तम प्रतिसाद देखील दिला आहे.⭕

Previous articleयुवा मराठा न्युजचे मराठवाडा विभागीय संपादक बालाजी पाटील यांचे आज नांदेडात आगमन
Next articleपुण्यातील खून प्रकरणी कुख्यात गुंड मारणे याच्यासह 22 जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here