Home Breaking News कंधार येथील तलावात  बुडुन पाच  जनाचा मृत्यु.

कंधार येथील तलावात  बुडुन पाच  जनाचा मृत्यु.

51
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220821-WA0078.jpg

कंधार येथील तलावात  बुडुन पाच  जनाचा मृत्यु.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नांदेड़ शहरातील देगलूर नाका भागातील खुतबेनगर चौरस्ता येथील पाच युवक कंधार दर्ग्याचे दर्शन घेन्यासाठी ऑटो रिक्षाने नांदेड येथून एकाच कुटुंबातील दोन सख्ये भाऊ तर चूलत भाऊ तिन जन दर्ग्यात थांबले होते.दर्ग्याच्या बाजूस आसलेले जंगतुंग तलाव आहे.
येथील तलावात बुडुन पाच जनांचा मृत्यु झाल्याची घटना  २१ आँगष्ट रोजी दुपारी आंदाजे २ते २:३० वाजता   घडली असुन  शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत पोलीस सुञाकडुन मिळालेली माहीती अशी की  येथील हजी सय्या सरवरे मगदुम  बडी दर्गाहा च्या दर्शनासाठी  आले होते. दर्शन घेवुन जेवन करण्यासाठी  श्री शिवाजी काॅलेज जवळील  तलावा लगत असणार्‍या  पायर्‍यांवर  बसुन जेवन झाल्यानंतर  प्लेट व हात धुण्यासाठी  त्यातील एकजन गेला असता त्याचा तोल जावुन पाण्यात पडला तो पडला म्हणुन त्याला काढण्यासाठी दुसरा   गेला तोही पडला असे एकाला एक काढण्यासाठी गेले यात  पाच जनाचा पाण्यात बडुन मृत्य झाला. आहे. यात मृत्युमध्ये सय्यद तोहीद सय्यद वहीद वय २०वर्ष रा. नांदेड, सय्यद नवीद सय्यद वहीद वय १५ वर्ष रा. नांदेड ,महमद सफीयद्दीन महमद गफुर वय ४५ वर्षे रा. नांदेड, महमद विखार महमद फकयेद्दीन वय २३वर्ष रा.नांदेड, महमदसाद मोहम्मद सफीयोद्दी वय १५ वर्षे रा.नांदेड
तलावात पडुन बुडाल्याची घटना शहरात वार्‍यासारखी पसरली आहे  शहरात व तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत कंधार पोलीस स्टेशनचे एपीआय. अदित्य लोणीकर, पीएसआय गोपाळ इंद्राळे यांनी माहीती दिली.

कंधार येथील दर्गा व्यवस्थापक किंवा नगरपालीका प्रशासन वर्गातून तलावात जानारे सर्व रस्ते भिंत बांधून बंद करावे किंवा त्या ठिकानी सुरक्षा गार्ड ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी अशीही मागणी भविक भक्तातून होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here