आशाताई बच्छाव
पूर परिस्थितीमध्ये सापडलेल्या लोकांना खा.अशोकजी नेते यांच्याकडून अन्नधान्य किटचे वाटप
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
भामरागड:-सततच्या पावसाने व अतिवृष्टीने घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले.या अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसाने घराचे व शेतीचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापुरामुळे अनेक नागरिकांचे घरे सुद्धा पडले.याची दखल घेत खा.अशोकजी नेते यांनी भामरागड वासिय परिसरातील लोकांना २६४ अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी खा.अशोकजी नेते.प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा,रविंद्रजी औलालवार संघटन जि. महामंत्री,विनोद आकनपलीवार जिल्हा उपाध्यक्ष,सुनिल विशवास ता.अध्यक्ष, सागर डेकाटे युवा मोर्चा उपाध्यक्ष,धनंजय पडशाल, उपस्थित होते