Home गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे खासदार- आमदार कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून...

जिल्हा काँग्रेसचे खासदार- आमदार कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ पूर पिढीतांना मोठी आर्थिक मदत देण्याची केली मागणी

77
0

आशाताई बच्छाव

IMG-20220821-WA0008.jpg

जिल्हा काँग्रेसचे खासदार- आमदार कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ पूर पिढीतांना मोठी आर्थिक मदत देण्याची केली मागणी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)://  जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने सतत पूरपरिस्थिती निर्माण होत आहे व मेद्दीगड्डा व गोसेखुर्द येतून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गा मूळे पूरपरिस्थिती तयार झाली आहे  त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार – तीबार पेरणीच संकट आली. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक नुकसान झाले.  जिल्ह्यातील  शेतकऱ्याने आत्महत्या करण्यास सुरुवात केली तरी अश्या परिस्थिती असतांना सुद्धा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार, खासदार राज्य शासनाना कडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजुनी आर्थिक मदत करण्यासाठी आवाज उठवला नाही यावरून जिल्ह्यातील आमदार ,खासदार लोकप्रतिनिधी निद्रा अवस्थेत आहेत की काय हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे? जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राज्याचे सन्मानीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले परंतु जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप कुठलीही भरीव निधीची मदत करण्यात आलेली नाही, अश्या निद्रा अवस्थेत असलेल्या सरकारला व स्थानिक आमदार खासदारांना जागे करण्या साठी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणी करिता जिल्हा काँग्रेस च्या वतीने 20 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रदेश महासचिव तथा जिल्हाप्रभारी डॉ.नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ.चंदा कोडवते, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पा.पोरेटी, शहराध्यक्ष सतीश विधाते गावतुरे, ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष रमेश चौधरी, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर,  जिल्हा उपाध्यक्ष शँकरराव सालोटकर, , ता.अध्यक्ष नेताजी, सहकार सेल अध्यक्ष शामराव चापले, रोजगार स्वयंम रोजगार सेल कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, अनुसूचित जाती विभाग महिला अध्यक्ष अपर्णा खेवले, विनोद लेनगुरे, समय्या पशूला, काशीनाथ भडके, वसंत राऊत, कुणाल पेंदोरकर, अब्दुल पंजवाणी, दिवाकर निसार, प्रभाकर कुबडे, ढिवरू मेश्राम, हरबाजी मोरे, दीपक रामने, रुपेश टिकले, संजय चन्ने, भैयाजी मुद्दमवार, श्रीनिवास ताडपल्लीवार, संदीप भैसरे, निखिल खोब्रागडे, तौफिक शेख, सुदर्शन उंदीरवाडे, राज डोंगरे, रुपेश सलामे,शुभम किरमे, प्रफुल बारसागडे,  अंकुश बारसागडे, चारुदत्त पोहणे, सुधीर बांबोळे, जावेद खान, स्वप्नील चौखुंडे, मजीद स्ययद, कल्पना नंदेश्वर, मंगला दास, सुनीता रायपुरे, आशा मेश्राम, अर्चना मेश्राम, नीलकंठ बावणे, मधुकर बावणे, दादाजी बावणे, शँकनाथ बावणे, गजानन रोहनकर, मनोहर गेडाम, यशवंत गुरनुले, देविदास बोलीवार सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Previous articleपिंपळगाव येथे सिमेंट काँक्रिट रोड बाधकामाचे लोकार्पण संपन्न
Next articleगडचिरोलीच्या पोस्ट ऑफिस ची सेवा तात्काळ बरखास्त करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here