आशाताई बच्छाव
जिंतूर येथील ऑर्किडस् इंटरनॅशनल स्कूल मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)
परभणी (जिंतूर) Orchids International School या शाळेत आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिंतूर औद्योगिक वसाहत संस्थेचे अध्यक्ष तथा ऑ. इं. स्कूल चे अध्यक्ष माननीय श्री धरमचंदजी मोतीलालजी अच्छा सर व्यासपीठावर मुख्याध्यापक श्री. गजानन ढोणे सर, तर पालक प्रतिनिधी म्हणून श्री. पांडुरंग बोरगीळ हे उपस्थित होते.
प्रतिमा पूजनानंतर ध्वजारोहण करण्यात आले.
तदनंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून शहरात सर्वप्रथम चैतन्यमय वातावरण निर्माण केले. याप्रसंगी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित विविध घोषणांची सादर घालण्यात आली. त्याशिवाय शाळेत विविध सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मा. अध्यक्ष श्री आच्छा सर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक गजानन सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक वर्गांनी परिश्रम केले या कार्यक्रमासाठी श्री. आकाश अच्छा सर, श्री.गणेश डोंबे सर सर, श्री अनिल जाधव सर, सौ. निशा शोभने ,मनिषा तायडे व सर्व शिक्षक कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहात कामकाज पाहिले.
शिक्षकेतर कर्मचारी
शीला ताई,
अनिता बाई व
गिरीश भाऊ यांनी सुध्दा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
*विशेष बाब म्हणजे प्रभातफेरी सोबत शाळेचे अध्यक्ष असल्यामुळे उत्साह द्विगुणित झाला होता.*