Home बुलढाणा राजकीय ! पालकमंत्री भाजपाचाच ? -शिंदेसेना – राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार?

राजकीय ! पालकमंत्री भाजपाचाच ? -शिंदेसेना – राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार?

100

आशाताई बच्छाव

1001075943.jpg

राजकीय ! पालकमंत्री भाजपाचाच ?

-शिंदेसेना – राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-बुलडाणा शर्यतीत नव्हते मात्र, वडिलांच्या पुण्याईने महायुतीचे आमदार अॅड. आकाश फुंडकर कामगार मंत्री झालेत आणि अन्य 3 जणांचा दावा फोल ठरला! आता पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, पालकमंत्रीपद भाजपाच्या आकाश फुंडकर यांनाच मिळणार असल्याचे संकेत
आहेत. दरम्यान शिंदे सेना आणि राष्ट्रवादी यांची भूमिका काय राहील? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

जळगाव जामोद चे माजी मंत्री डॉ. संजय कुटे, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती, चिखलीच् या आमदार श्वेता महाले यांच्या मंत्रिपदाची चर्चा अखेरच्या क्षणापर्यंत होती. त्याचवेळीअखेर पर्यंत स्पर्धेत नाव नसलेल्या अॅड. आकाश फुंडकर यांच्या गळ्यात अनपेक्षितपणे मंत्रिपदाची माळ पडली. त्यामुळे इतर तीनही आमदारांनी आता धीर धरला की नाही हे माहीत नाही. तर डॉ. संजय कुटे यांनी मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी भूमिकाही समाजमाध्यमांवर मांडली. दरम्यान शिंदे सेना व राष्ट्रवादीचा आता जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी हस्तक्षेप सुरु आहे. परंतु आकाश फुंडकर यांनाच पालकमंत्री पद मिळणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

Previous articleसमृद्धी’वर डिझेल चोरांची टोळी गजाआड ! – दोन वाहने जप्त
Next articleब्रेकिंग ! अपघातग्रस्त कार पेटून एक भाजला ! चौघे जखमी !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.