Home भंडारा भंडारा जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांची होणार चौकशी

भंडारा जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांची होणार चौकशी

185

आशाताई बच्छाव

Screenshot_20220810-055302_Google.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: भंडारा जिल्ह्यातील सामुहिक बलात्कार प्रकरण; अखेर त्या पोलिसांची होणार चौकशी ,भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करून घेण्यास उशीर केल्याने या पिढीते वरती दुसरा बलात्कार झाला.भंडारा पोलस अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवताना केलेला उशीर त्या मुलीसाठी असय वेदना करून गेला. त्या पीडित मुली वरती पहिला बलात्कार भंडारा जिल्ह्यामध्ये झाला.दुसरा बलात्कार कन्हाड मोह या परिसरामध्ये झाला .जर पोलिसांनी ही तक्रार नोंदवून घेतली असती तर हा दुसरा बलात्कार टाळता आला असता असे या पीडित महिलांचे वक्तव्य आहे .या अधिकाऱ्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.लाखनी पोलीस स्टेशनवरील अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर झालेले हे आरोप खरे की खोटे याची पडताळणी चालू आहे यासाठी पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवताना अक्षम्य गुन्हा केला आहे. त्यांच्यावरती कारवाईसाठी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार आहे.

Previous articleसंजय राऊत यांना १४ दिवसाची न्यायलयीन कोठडी
Next articleमुखेड प्रशासनाला याची लाज वाटली पाहिजे_शिवशंकर पाटील कलंबरकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.