आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी! एक महिन्यापासून ईडीच्या कोठडीत असलेले संजय राऊत पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी चौकशी आलेली आहेत त्यामध्ये आज त्यांना ईडी कोठडी न मागितल्यामुळे कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने त्यांना घरचं जेवण व औषधांचा पुरवठा होण्यासाठी परवानगी दिली आहे. ते आज आर्थर रोड जेलमध्ये दाखल झाले. ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले की अलिबाग मध्ये असलेली जमीन खरेदीसाठी त्यांनी मूळ मालकांना धमकावले. तसेच संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यामध्ये जमा झालेले रुपये हे कुठून आले त्याची चौकशी चालू आहे






