Home गडचिरोली चामोर्शी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी लवकरच निधी मिळवून देणार आमदार डॉक्टर...

चामोर्शी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी लवकरच निधी मिळवून देणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0077.jpg

चामोर्शी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी लवकरच निधी मिळवून देणार

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
पंचायत समितीच्या चामोर्शी च्या वाटरप्रूफिंग करिता निधी उपलब्ध करून देण्याची केली मागणी

चामोर्शी पंचायत समितीला भेट देवून पावसाच्या पाण्यामुळे गळणाऱ्या भागाची केली पाहणी

चामोर्शी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी आपण शासन स्तरावर पत्रव्यवहार केला असून त्याकरिता लागणाऱ्या निधीची मागणी ही केली आहे त्यामुळे लवकरच या पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी शासन स्तरावरून आपण निधी मिळवून देऊ असे आश्वासन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दिले.

नवीन प्रशासकिय ईमारत ऊभी होईपर्यंत या पंचायत समितीच्या चामोर्शी च्या वाटरप्रूफिंग करिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी वरिष्ठांकडे केली

याप्रसंगी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी श्री पाटील जी, सहाय्यक बीडिओ वरघंटीवारजी, विस्तार अधिकारी काळबांधेजी ,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हुलके साहेब, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, महामंत्री साईनाथजी बुरांडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रतिकजी राठी, ओबीसी नेते भोजराजजी भगत यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

पावसाच्या पाण्यामुळे पंचायत समितीची इमारत गळत असून या ठिकाणी पावसात येणाऱ्या अडचणी समीतीच्या अधिकाऱ्यांनी आमदार महोदयांजवळ मांडल्या. त्या नंतर आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या इमारतीची पाहणी केली. त्या ठिकाणी त्यांना इमारत काही भागांमध्ये खरोखरच गळत असल्याचे दिसून आले. अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या अडचणीही समजून आल्यात त्यामुळे त्यांनी लगेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना आश्र्वस्त करीत आपण पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारती करिता निधी उपलब्ध करून देऊ असे त्यांना आश्वस्त केले

Previous articleधो- धो पावसातही काँग्रेसच्या ” गौरव यात्रेला ‘ दमदार सुरूवात आझादी अमृत महोत्सव पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleसुधीर मुनगंटीवार यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here