Home नांदेड घुंगराळा येथे वीज समस्या मेळावा संपन्न. आयोजक वसंत सुगावे पाटील यांची माहिती.

घुंगराळा येथे वीज समस्या मेळावा संपन्न. आयोजक वसंत सुगावे पाटील यांची माहिती.

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20220807-WA0033.jpg

” घुंगराळा येथे वीज समस्या मेळावा संपन्न.
▪️ आयोजक वसंत सुगावे पाटील यांची माहिती.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
घुंगराळा:नायगाव तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे ,व देखभाल दुरुस्तीची कामे वेळेवर होत नसल्याकारणाने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी महावितरण चे नांदेड परिमंडळाचे कार्यकारी अभियंता श्री. राख साहेब , देगलूर चे कार्यकारी अभियंता श्री श्रवणकुमार साहेब,नायगाव चे उपकार्यकारी अभियंता श्री दंडगव्हाल साहेब यांच्यासह सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता , नायगाव तालुक्यातील वीज वितरण कंपनीचे सर्व कर्माचारी यांच्या उपस्थतीत वीज समस्या मेळाव्याचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगाव पंचायत समितीचे माजी सदस्य परबतराव पा.जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. सदस्य सूर्याजी पा. चाडकर , सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पा . बेंद्रीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात अनेक गावाचे नागरिक, सरपंच,यांनी वीज समस्येबद्दल आपआपल्या गावातील समस्या महावितरणच्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. अनेक गावांत डी. पी. नसणे,डी.पी ची नादुरुस्त असणे,पोल मोडलेले, वाकलेले असणे ,नवीन लाईन टाकणे याबाबत उपस्थित नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी वीज पुरवठया बाबतच्या व्यथा अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. वीज पुरवठा सुरुळीत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या कामांचा प्रश्न भेडसावत आहे याबाबतही उपस्थितांनी अधिकाऱ्यांना सांगितले. वीज पुरवठा सुरुळीत नसल्यामुळे दळण दळण्यासाठी 5 ते 10 किमी अंतरावरील गावांत जाऊन दळण आणावे लागत आहे .अशा स्वरूपाच्या व्यथा या मेळाव्यात मांडण्यात आल्या.व लेखी स्वरूपात देण्यात आल्या.
यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व शेतकरी, व लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेऊन उपस्थित कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर ही कामे मार्गी लावा असे आदेश दिले. व खंडित होणारा वीज पुरवठा, नवीन डीपी बसवणे ही कामे तात्काळ करून वीज पुरवठा सुरुळीत करू असे आश्वासान महावितरण च्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना दिले .
या मेळाव्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक वसंत सुगावे पाटील यांनी केले. यावेळी सदाशिव पा. पचलिंग (संचालक कृ. उ.बाजार समिती, कुंटुर), माधवराव कोलगाने (सरपंच, बरबडा), मारोतराव कदम (सरपंच, कुंटुर), निलेश देशमुख (सरपंच, रुई), धोंडिबा इजगिरे (सरपंच, सावरखेड), गंगाधर पा. बेलकर (सरपंच, बळेगाव), छत्रपती पा. मोरे (सरपंच प्रतिनिधी, देगाव), राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अमोल सातेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे नायगाव तालुकाध्यक्ष केरबा रावते,यदुराज पा. जाधव (सरपंच, सातेगाव), साईनाथ पा. हेंडगे (ग्रा. पं. सदस्य कहाळा), संतोष वानखेडे (उपसरपंच, सावरखेड), बसवेश्वर गुडपे (उपसरपंच,देगाव), डॉ.कदम साहेब (उपसरपंच, सांगवी), विजय जाधव (सरपंच, कुष्णूर), सूर्यवंशी साहेब (सरपंच, इकळीमाळ), माहेताब शेख (सरपंच खैरगाव), दीपक पाटील ( सरपंच, रुई खुर्द), साहेबराव कांबळे (सरपंच, पळसगाव), गजानन पा. तोडे ( उपसरपंच, आंतरगाव), शिवाजी पा. शिंदे, दत्ता पा. शिंदे (उपसरपंच, पळसगाव), गंगाधर पा. कदम ( सदस्य ग्रा. पं. कार्यालय, वंजारवाडी), गोविंद पा. जाधव (उपसरपंच, निळेगव्हान), हणमंत कोंडेवाड (सरपंच, वंजारवाडी), प्रल्हाद पिंपळे( शिवसेना उपतालुकाप्रमुख), प्रकाश गारोळे ( सरपंच, हिप्परगा), संगम पाटील (उपसरपंच,कहाळा), विठ्ठल पा. मोरे (ग्रा.पं. सदस्य,देगाव), व्यंकट पा. जाधव (ग्रा. पं. सदस्य, कुष्णूर), अमृता पा. वानखेडे (ग्रा. पं. सदस्य, सावरखेड), ( मोहन पा. कदम (तं. मु. अध्यक्ष, हिप्परगा), रामकिशन बहिरवाड ( सरपंच,कहाळा), यादवराव भिलोडे (उपसरपंच, टाकळी बु.), सूर्यभान कोंडीबा (सरपंच मांडणी), गोविंदराव ताटे (उपसरपंच, मांडणी), चंद्रशेखर जाधव (उपसरपंच, रानसुगाव), भिमराव कोंडेवाड (मा.सरपंच, वंजारवाडी), मल्लिकार्जुन डांगे साहेब (मा.सरपंच कुष्णूर), यादवराव पा.(मा.उपसरपंच, टाकळी), रुद्रा पा. जाधव (ग्रा. पं. सदस्य, रानसुगाव), गोपाळराव पा. पांडे (मा.चेअरमन रुई बु.), आनंदा पा. जाधव (चेअरमन, रानसुगाव), विश्वांभर पा. कदम (पोलीस पाटील वंजारवाडी), हणमंत पा. वानखेडे (चेअरमन, सावरखेड), लक्ष्मणराव पा. (मा.पोलीस पाटील रुई बु.), नारायण पा. जाधव, माधव पा. जाधव, साईनाथ हेंडगे, (कहाळा), विश्वंभर जाधव, रावसाहेब पा. जाधव , सदाशिव पंचलिंग, शिवाजी पंचलिंग , ज्ञानेश्वर मोरे , रामकिशन जाधव, इ. लोकप्रतिनिधींसह नायगाव तालुक्यातील ३० ते ४० गावांतील विजसमस्या ग्रस्त शेतकरी, लघुउद्योजक ,नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या वीज समस्या मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल शेतकरी, व नायगाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष आदी लोकप्रतिनिधींनी वसंत सुगावे पाटील यांचे आभार मानले.
सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालाजीराव मातावाड साहेब, नागोराव दंडेवाड साहेब, ग्रामविकास अधिकारी हणमंतराव शिंदे, मुरहरी तुरटवाड, माधव पा. ढगे, श्यामराव यमलवाड, गोविंदराव पांचाळ, तंटामुक्ती अध्यक्ष श्याम पा. ढगे, विठ्ठल बाष्टे, गंगाधर पांचाळ, चेअरमन नारायण पा. ढगे, नागेंद्र जक्केवाड, रामचंद्र ढगे, विलास ढगे, राजेश ढगे, गंगाधर ढगे, विशाल जाधव, योगेश ढगे, शंतनू ढगे, उमेश कदम, आदींनी परिश्रम घेतले..

Previous articleजिल्हा प्रशासन, जनजागृती संघ, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, लायन्स क्लबतर्फे आयोजन
Next articleप्रहारच्या तालुका अध्यक्षपदी शिंदे तर विधानसभा अध्यक्ष पदी राठोड यांची निवड.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here