Home रत्नागिरी चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या बुस्टर डोस शिबिराला प्रतिसाद

चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या बुस्टर डोस शिबिराला प्रतिसाद

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0018.jpg

चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या बुस्टर डोस शिबिराला प्रतिसाद

रत्नागिरी(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): शहरातील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आयोजित कोरोना लसीकरण (बुस्टर डोस) शिबिराला जोशी पाळंद परिसरासह स्थानिक मंडळींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चित्पावन मंडळाच्या (कै.) ल. वि. केळकर वसतीगृहाच्या सभागृहात हे शिबिर आज सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत आयोजित केले होते. या वेळी बुस्टर डोससह दुसरा डोस १६८ जणांनी घेतला. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. दीपप्रज्वलनाने शिबिराला सुरुवात झाली. यामध्ये तीन परिचारिकांनी लसीकरण केले. त्यांचे स्वागत स्थानिक नगरसेविका सौ. सुप्रिया रसाळ यांनी केले. या वेळी चित्पावन मंडळाचे कार्यवाह राजन पटवर्धन, भाजपा कामगार आघाडी शहराध्यक्ष संदीप रसाळ, शेखर लेले, रविकांत शहाणे, मोहन पटवर्धन, सुधाकर वैद्य यांच्यासमवेत मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. ल. वि. केळकर वसतीगृहामधील विद्यार्थ्यांनीही शिबिराकरिता मदत केली.

Previous articleभास्कर जाधवांची घसरली जीभ; राज्यपालांना म्हटलं ‘घरगडी’
Next articleसरपंच विठ्ठल सावंत यांच्या हस्ते पाली येथे कुस्ती सराव केंद्राचे उदघाटन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here