• Home
  • परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालया अंतर्गत आज शहरातील राजशेखर मंगल कार्यालय येथे नेतृत्व गुण विकास शिबिर या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.

परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालया अंतर्गत आज शहरातील राजशेखर मंगल कार्यालय येथे नेतृत्व गुण विकास शिबिर या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0069.jpg

परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालया अंतर्गत आज शहरातील राजशेखर मंगल कार्यालय येथे नेतृत्व गुण विकास शिबिर या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.
देगलूर तालुका प्रतिनिधी गजानन शिंदे (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर-आज परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालया अंतर्गत शहरातील राजशेखर मंगल कार्यालय येथे नेतृत्व गुण विकास शिबिर या विषयावर एक दिवशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांतर्गत चौथ्या सत्रामध्ये श्री मच्छिंद्र जी गवाले (सरपंच मरखेल) याचे आदर्श नेतृत्व या विषयावर व्याख्यान झाले, श्री अविनाशराव हसनाळकर देसाई (संस्थेचे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य) नायब तहसीलदार श्री पंगे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत मला अध्यक्षीय समारोप करण्याची संधी भेटली, श्री तपोवनकर सरांनी माझे स्वागत केले. त्याबद्दल मी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांचा मनापासून आभारी आहे. शेवटच्या सत्रात मंचावर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेन्द्र अलुरकर भाऊ, शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष चंदू सेठ रेखावार, उपाध्यक्ष गिरीश भाऊ वझलवार, सौ अलुरकर ताई, श्री.मुख्याध्यापक सर, श्री.वाघमारे सर.
ज्या शाळेत मी पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलं त्याच शाळेमध्ये शालेय कार्यक्रमांतर्गत अध्यक्षीय समारोप करण्याची संधी व शाळेकडून माझा सन्मान करण्यात आला खरोखरच ही माझ्यासाठी खूप मोठी शिदोरी आहे.
नगरसेवक -प्रशांत लच्छीराम दासरवार आदींची यावेळी उपस्थिती होती.

anews Banner

Leave A Comment