Home परभणी दुचाकीवरून देशी दारूचा बॉक्स नेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले

दुचाकीवरून देशी दारूचा बॉक्स नेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220802-WA0010.jpg

दुचाकीवरून देशी दारूचा बॉक्स नेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

(परभणी)जिंतूर:-तालुक्यातील करंजी ते बामणी या मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वाराजवळ देशी दारूचा साठा पोलिसांनी रविवारी जप्त केला. बामणी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कवठा येथील दोघांना देशी दारूचा बॉक्स नेताना पोलीसांनी रंगेहाथ पकडला आहे.
कवठा येथील प्रसाद देवीदास साबळे, अर्जुन यशवंत भूतकर हे दोघे (एमएच २२ एल ५१३) या दुचाकीहून देशी दारूचे बॉक्स विक्री करण्यासाठी स्वतःजवळ बाळगताना पोलिसांना मिळून आले. त्यांच्याजवळ दारूच्या ४८ बाटल्या आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी दारुसाठा जप्त केला. त्यावरून पोलीस कर्मचारी वसंत निळे यांनी दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. बामणी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी भगवान सोडगीर हे तपास करीत आहेत

Previous articleगौसे आजम सेवा भावी संस्थेचे शाखाच्या वतीने श्रीरामपुरता अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
Next articleफरची पुलाअभावी शेतकऱ्यांची गैरसोय.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here