Home युवा मराठा विशेष पत्रकारितेचे बाळकडू लहानपणापासून अनुभवातून मिळाले ज्ञान

पत्रकारितेचे बाळकडू लहानपणापासून अनुभवातून मिळाले ज्ञान

29
0

आशाताई बच्छाव

IMG-20220713-WA0006.jpg

पत्रकारितेचे बाळकडू लहानपणापासून अनुभवातून मिळाले ज्ञान
वाचकहो,
मी पत्रकारिता क्षेत्रात अगदी अनावधनानेच आली.तस पाहिलं तर लहानपणापासून मेव्हणभाऊ राजेंद्र पाटील राऊत यांची पत्रकारिता कशी निर्भिड व तारेवरची कसरत होती.हे जवळून बघत आली.पत्रकारिता क्षेत्रात असल्यामुळे राजेंद्र पाटील राऊत यांच्या जीवनाची दगदग व धावपळ कशी होती,अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी राजेंद्र पाटील राऊत हे कशा पध्दतीने लेखनीच्या माध्यमातून झगडत होते हे मी अगदी लहानपणापासून जवळून बघितलेले आहे व अनुभवलेले सुध्दा आहे,मात्र पुढे माझे लग्न झाल्यानंतर प्रपंच व संसाराच्या रहाटगाडग्यात सगळं तसच मागे राहिले.मलाही पत्रकारिता क्षेत्राची तशी आवड होतीच.पण…कुठल्याही गोष्टीला योग महत्त्वाचा असतो.आणि माझ्या जीवनातही तसा योग चालून आला,सन २००५ पासून युवा मराठा वृतपत्रातून मी पत्रकारितेला सुरुवात केली.ती आज अखेर कायम आहे.राजेंद्र पाटील राऊत यांच्यासोबत मला मुंबईतील वृतपत्र सत्यवार्ता,कोल्हापूर विशेष,पोलिस कस्टडी,पोलिस नजर सारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या वृतपत्रात महिला पत्रकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळेच माझा नावलौकिक सर्वदूर पर्यत एक महिला पत्रकार म्हणून झाला.आज युवा मराठा वृतपत्राच्या माध्यमातून माझा सुरु झालेला पत्रकारितेचा प्रवास मला अनेक मान सन्मान देऊन गेला.या क्षेत्राची आवड निर्माण करणाऱ्या व सतत मार्गदर्शन करुन बातम्यामधील बारकावे समजावून सांगणारे राजेंद्र पाटील राऊत हेच माझ्या गुरुच्या स्थानी आहेत.आजच्या गुरुपौर्णिमेनिमित त्यांना लाख लाख शुभेच्छा!!
श्रीमती आशाताई बच्छाव
व्यवस्थापकीय संपादक
युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड वेब न्युज चँनल महाराष्ट्र

Previous articleमाझा पत्रकारितेतला पहिला गुरु माझी आई! “प्रोत्साहन देणारी आशाताई”
Next articleगुरुपौर्णिमा..2022
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here