Home गडचिरोली गडचिरोली जिल्ह्याकरिता मेडिकल कॉलेज होण्यासाठी वारंवार केलेल्या मागणीला व पाठपुराव्याला अखेर यश.

गडचिरोली जिल्ह्याकरिता मेडिकल कॉलेज होण्यासाठी वारंवार केलेल्या मागणीला व पाठपुराव्याला अखेर यश.

87
0

आशाताई बच्छाव

IMG-20220712-WA0024.jpg

गडचिरोली जिल्ह्याकरिता मेडिकल कॉलेज होण्यासाठी वारंवार केलेल्या मागणीला व पाठपुराव्याला अखेर यश.

खा.अशोकजी नेते.

जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील मा.खा.अशोकजी नेते यांनी पत्रकार परिषदेतून मांडले विचार.

गडचिरोली(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):- आज दिं.12 जुलै 2022 गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरिता प्रयत्नशील पत्रकार परिषदेतून मांडले विचार खा.अशोकजी नेते.
गडचिरोली दौऱ्यावर आलेले मा. मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी पहिल्याच भेटी दरम्यान वारंवार केलेल्या मागणीला व पाठपुराव्याला प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून गडचिरोली जिल्ह्याकरिता मेडिकल कॉलेज उभारण्याची घोषणा केली.त्याबद्दल या क्षेत्राचा खासदार म्हणून मनापासून, हृदयापासून,अंतकरणातून आभार व्यक्त करतो. अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेतून केली.
जिल्हायात आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले आरोग्य जनतेला मिळावे हया दृष्टिकोनातून जिल्ह्यात मेडिकल कॉलेज उभारण्याची घोषणा केली.
यासाठी मा.खा.अशोकजी नेते यांनी सतत केलेल्या मागणीला व पाठपुराव्याने लोकसभेत 2020 मध्ये तारांकित प्रश्‍नाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करा ही मागणी लोकसभेतून केली होती. त्यानुसार तत्कालीन आरोग्यमंत्री मान.डॉ. हर्षवर्धनजी यांनी उत्तरात सांगितले होते की, राज्य शासनाकडून प्रस्ताव लवकर पाठवा‌.त्यानुसार राज्यशासनाकडून प्रस्ताव आल्यावर मेडिकल कॉलेज मंजूर करू असे आश्वासन दिले होते. त्यासाठी पत्राच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा पत्राद्वारे मागणी केली होती. तसेच तात्कालीन पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याकडे सुद्धा मागणी करून चर्चा केली होती
याच अनुषंगाने दिनांक11 जुलै 2022 गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या, तसेच पूरग्रस्तांचा आढावा संबंधी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता मा.मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे,व मा.उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याकरिता वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केल्याबद्दल मा.खा. अशोकजी नेते यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले.
तसेच मेडडीगट्टा धरणाच्या संदर्भातील प्रश्न लवकर निकाली काढावे. शेतकऱ्यांना कृषी पंपांविषयी समस्या मार्गी लावावे. जे शेतकरी डिमांड भरले त्यांना त्वरित वीज उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नरभक्षक वाघाने लोकांचे जीव घेतलेला आहे.अशा वाघांना बंदिस्त करून बंदोबस्त करा.
आलापल्ली ते सिरोंचा पर्यंत नॅशनल हायवे लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावा. तसेच अतिवृष्टीमुळे नुकताच वेल्लगुर तलाव फुटल्याने कुठलीही हानी होऊ नये याकरिता लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावे. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी.इत्यादी प्रश्न खा.अशोकजी नेते यांनी पत्रकार परिषदेत मांडले
याप्रसंगी खा.अशोकजी नेते. जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे,महामंत्री गोविंदजी सारडा,रमेशजी भुरसे किसान आघाडीचे प्रदेश सदस्य,अनिल कुनघाडकर माजी न.प. उपाध्यक्ष, संजय बारापात्रे, तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते.

Previous articleजिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 22.20 मि.मी. पाऊस.
Next articleवसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामदास सोनवणे यांचे निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here