Home नांदेड कृषि दिनानिमित्त नांदेड जिल्ह्याच्या सर्व शाळांमध्ये होणार शेती आणि शेतकऱ्यांचा जागर –...

कृषि दिनानिमित्त नांदेड जिल्ह्याच्या सर्व शाळांमध्ये होणार शेती आणि शेतकऱ्यांचा जागर – मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

202
0

आशाताई बच्छाव

IMG-20220701-WA0008.jpg

कृषि दिनानिमित्त नांदेड जिल्ह्याच्या सर्व शाळांमध्ये होणार शेती आणि शेतकऱ्यांचा जागर
– मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 30 :- संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांकडे मोठ्या गौरवाने पाहिले जाते. कृषिक्षेत्राशी निगडीत निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे वेळोवेळी निर्माण होणाऱ्या आव्हानातून स्वत:ला सावरत शेतीला सावरण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शेतकऱ्यांनी समर्थपणे पेलवली आहे. त्यांच्या कष्टाचा, त्यागाचा, श्रमाचा यथोचित गौरव होण्यासमवेत नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमध्ये शेती आणि शेतकऱ्यांचा जागर करण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा परिषदेने घेतला आहे. या उपक्रमातून शेतकऱ्यांच्या शाळेत शिकणाऱ्या नव्या पिढीला शेतीविषयी अधिक लळा लागावा, आवड उत्पन्न व्हावी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहय्याने प्रगतशील शेतीचा मंत्र त्यांच्या मनात रुजावा या उद्देशाने हा अभिनव उपक्रम हाती घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.

या अभिनव उपक्रमासाठी प्रत्येक तालुक्यातील काही निवडक गावात वृक्ष लागवडीचे उद्दीष्टही देण्यात आले आहे. याचबरोबर पाण्याचे मोल लक्षात यावे यासाठी जलपूजन, पाणी बचतीसाठी व जमिनीत मुरविण्यासाठी पूर्नभरण, आपल्याच शेतात उत्पादित झालेल्या गुणवत्तापूर्ण बियांणांना बाजूला काढून पेरणीपूर्वी त्याची तपासणी करण्याच्या उद्देशाने आवश्यक असलेली बीज प्रक्रिया, बीबीएफ पद्धतीने पेरणी आदी बाबत माहितीही विद्यार्थ्यांना दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपली शेती आणि आपला गाव याविषयी आत्मविश्वास वृद्धींगत व्हावा यादृष्टीने शाळांमध्ये शेतीशी निगडीत माहिती पोहचवली जाणार आहे. यात आपल्या राज्यातील पिके, जिल्ह्यातील पिके, हरितक्रांतीतून साधलेली स्वयंपूर्ण: गळीत धान्याच्या उत्पादनासाठी स्वावलंबी बाणा, सोयाबीन लागवड, कापसा ऐवजी इतर पिकांवर शेतकऱ्यांचा वाढलेला कल, वृक्षलागवड, शेतीतील अर्थकारण, फळे, दूध, भाजीपाला याबाबत सजगता आदी विषयाची ठळक माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल.

Previous articleआदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण.
Next articleशेतकऱ्यांबद्दल प्रत्ये‍क विद्यार्थ्यांच्या मनात स्वाभिमान निर्माण करू – मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here