Home पुणे पोलीस आयुक्त , खाकी वर्दीला बदनाम करणाऱ्या वर्दीतील गुंडावर ” अंकुश ”...

पोलीस आयुक्त , खाकी वर्दीला बदनाम करणाऱ्या वर्दीतील गुंडावर ” अंकुश ” लावणार का

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20220630-WA0042.jpg

  1. पोलीस आयुक्त , खाकी वर्दीला बदनाम करणाऱ्या वर्दीतील गुंडावर ” अंकुश ” लावणार का
    पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
    तरुणाला अश्लील शिवीगाळ , उर्मट उद्धट आर्वाच्च भाषा वापरून , बेदम मारहाण करणाऱ्या व बंदुकीचा धाक दाखवून धमकी देणाऱ्या सांगवी पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक एस . बी . कदम याना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा – अपना वतन संघटनेची मागणी”
    पोलीस प्रशासन हि देशाची अतिशय महत्वाची प्रशासकीय संस्था असून घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराचे रक्षण करणारे सर्वात महत्वाचे प्रशासकीय अंग आहे. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ याचा अर्थ चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे . परंतु काही भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकाऱ्यांमुळे जनतेच्या मनात भीती व अविश्वास निर्माण होत आहे. पोलीस आपल्या अधिकाराचा गैरवापर करून किती बेकायदेशीर , बेजबाबदार व पीडादायक , माणुसकीला लाजवेल असा व्यवहार सामान्य नागरिकांसोबत करू शकतात याचे उदाहरण पिंपरी चिचंवड शहरातील सांगवी पोलीस स्टेशन मध्ये घडले आहे.
    झालेला प्रकार असा कि, सांगवी मधील एका तरुणाने अपना वतन संघटनेकडे केलेल्या तक्रार अर्जानुसार , तक्रारदार दि.२५/०६/२०२२ रोजी गौरव पोरे या त्याच्या मित्राच्या गाडीचा अपघात झाल्याने मदतीसाठी सांगवी पोलीस स्टेशन या ठिकाणी गेले होते. त्यावेळी तक्रारदार व ज्यांच्या गाडीने अपघात झाला होता त्यांचे नातेवाईक तक्रारदार यांना पोलीस तक्रार करू नका म्हणून विनंती करीत होते . त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांना सांगितले कि, गाडीचे मोठे नुकसान झाले आहे ती नुकसान भरपाई करून द्या किंवा जखमी मित्राचा दवाखान्याचा खर्च करा . या दोघांमधील संभाषण चालू असताना सांगवी पोलीस स्टेशन मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी . कदम हे केबिनमधून बाहेर आले व तू कोण आहेस त्याना सांगणारा , आमच्या पोटावर पाय देतो का म्हणत त्यांनी तक्रारदार यांना मोठमोठयाने ओरडत , उद्धट ,उर्मट व आर्वाच्च भाषा वापरून तक्रादार यांच्या कॉलर ला पकडून अमानुषपणे खेचत खेचत सीसीटीव्ही नसलेल्या डीबी रूम मध्ये नेले. सदरचा प्रकार हा पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.
    डीबी रूम मध्ये नेल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी . कदम यांनी तक्रारदार यांना अश्लील शिवीगाळ करीत , लाथा ,बुक्यांनी अमानुषपणे मारहाण सुरु केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी . कदम हे नशेत असल्याप्रमाणे पोलिसांच्या बेल्ट ने व बेल्टचा दांड्याने डोक्यावर , हातावर ,पायावर व पाठीच्या खाली अवघड जागेवर १५ मिनिटे सातत्याने बेदम मारहाण करीत होते . हा प्रकार पाहून उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते . याशिवाय त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीचा गैरवापर करून ,धाक दाखवून या रूममध्ये झालेला प्रकार बाहेर गेला तर तुझ्या गांडीत गोळ्या घालीन अशा पद्धतीची धमकी देऊन त्यांनी कहरच केला आहे.जखमींना दवाखान्यात जाण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक असताना तक्रारदार यांना मेडिकल साठी चिट्ठी सुद्धा लिहून देण्यात आली नाही . तसेच औंध येथील एसआय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा मेडिको लीगल केस दाखल न करता उलट आमची पोलसांविरुद्ध तक्रार नाही असे लिहून घेतले आहे. सदर मारहाणीप्रकरणी तक्रारदार यांच्या आईंची तक्रार सुद्धा सांगवी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवून घेण्यात आलेली नाही. अशा प्रकारे संपूर्ण सांगवी पोलीस मध्ये तक्रादार यांच्यावर अन्याय व अत्याचार करण्यात आला. या प्रकरणात तक्रारदार यांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास झालेला आहे .मारहाण करतेवेळी जीवितास धोका होऊ शकला असता.असा गंभीर प्रकार सांगवी पोलीस स्टेशनमध्ये झालेला आहे.
    तक्रारदार यांचा कसलाही दोष नसताना ते फक्त मित्राला मदत करायला गेलेले असताना , द्वेष व राग मनात धरून ,आपल्या पदाचा व शस्त्राचा गैरवापर करून , बंदुकीचा धाक दाखवून धमकावणे , अश्लील शिवीगाळ करणे ,असभ्य , उद्धट ,आर्वाच्च भाषा वापरून आत्म सन्मानास ठेच पोहचवणे व अवमान करणे , मारहाण करण्याचा अधिकार नसताना बेल्ट व बेल्टच्या दांड्याने अमानुषपणे बेदम मारहाण करणे , खाकी वर्दीचा गैरवापर करणे , अशा प्रकारे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी . कदम यांनी कायद्याचे उल्लंघन करून आरोपीसारखे वर्तन केलेले आहे . कर्तव्यात कसूर व बेजाबदारपणा दाखवलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम १९७९ नुसार कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा. तसेच असा व्यक्ती पोलीस दलाला बदनाम करीत असल्याने त्यांना पोलीस वर्दीत राहण्याचा अधिकार नाही . त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी . कदम यांच्यावर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १९७ प्रमाणे योग्य तो गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे.अशी मागणी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी मा. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे , पोलीस उप आयुक्त मा. आनंद भोईटे , सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत दिसले , सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांच्याकडे करण्यात आलेली आहे .
    संदर्भ :- श्री . गणेश कांची यांनी दि. २७/०६/२०२२ रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी यांना दिलेले तक्रार अर्ज
    अपना वतन – सर्वसामन्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढणारी राष्ट्रप्रेमी संघटना
Previous articleकामगारांना आर्थिक सक्षम करणा-या रायरेश्वर व मातोश्री पतसंस्थेचे कार्य उल्लेखनीय – इरफान सय्यद
Next articleआषाढी एकादशीला पंढरपूर सह आजूबाजूला मद्यविक्रीस बंदी, जिल्हाधिकार्‍यांचा आदेश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here