Home पुणे कामगारांना आर्थिक सक्षम करणा-या रायरेश्वर व मातोश्री पतसंस्थेचे कार्य उल्लेखनीय – इरफान...

कामगारांना आर्थिक सक्षम करणा-या रायरेश्वर व मातोश्री पतसंस्थेचे कार्य उल्लेखनीय – इरफान सय्यद

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20220630-WA0043.jpg

कामगारांना आर्थिक सक्षम करणा-या रायरेश्वर व मातोश्री पतसंस्थेचे कार्य उल्लेखनीय – इरफान सय्यद
रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्था आणि मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्थाची वार्षिक सर्व साधारण सभा उत्साहात पार
पिंपरी –प्रतिनिधी उमेश पाटील
पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नागरी आहे येथे असंघटित क्षेत्रातील कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत त्यात प्रामुख्याने माथाडी कामगार यांचा उल्लेख करावा लागेल या माथाडी कामगाराला स्वतःच्या पायावर उभे करायला तसेच त्याला आर्थिकसक्षम करण्यात रायरेश्वर व मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्था यांचे योगदान कार्य उल्लेखनीय आहे, अशी भावना कामगार नेते इरफान सय्यद यांनी व्यक्त केली.
सहकारात अनेक बँका पतसंस्था मोठ्या संख्येने आहेत. पण या सर्वात कामगारांच्या आर्थिक विकासासाठी त्यांना पाठबळ देण्याची मानसिकता दिसून येत नाही. म्हणून कारखान्यात कामगार सोसायटी निर्माण झाल्या, पण त्यात कायम आणि संघटित कामगार यांचा सहभाग जास्तं होता. असंघटित क्षेत्रातील माथाडी कामगार यांच्या करिता १२ वर्षापूर्वी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि आज सन २०२१- २२ मध्ये जवळपास १७ कोटीचा आर्थिक व्यवहार या पतसंस्थेत केला जातो ही खूपच उल्लेखनीय बाब आहे. कामगाराच्या सभासद कामगार यांच्या कुटुंबातील लग्न, समारंभ विविध कार्यक्रम याकरिता महारष्ट्र मजदुर संघटना व दोन्ही पतसंस्था यांच्या वतीने लवकरच एक सुनियोजित हॉल करण्यात येईल. तत्कालीन भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शासन आदेश काढून पतसंस्था मोडीत काढण्याचा जो अखला होता. त्यावेळी महारष्ट्र मजदुर संघटना यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन कायदेशीर मार्गाने हा अध्यादेश मागे घेण्यास लढा दिला. हा सहकारातील हा असंघटित कामगार यांच्या करिता उभा केलेला हा वृक्ष असच खूप मोठा व्हावा, अशा शब्दात कामगार नेते इरफान सय्यद यांनी पतसंस्थेचे कार्यकारी मंडळ व सभासद कामगार यांना शुभेच्छा दिल्या.
रायरेश्वर माथाडी कामगार पतसंस्था यांचे एकूण भाग भांडवल १० कोटी असून सुमारे ८ कोटी पर्यंत सक्रिय सभासद यांना कर्ज वाटप केले आहे. तसेच यासंस्थेतील मयत सभासद कामगार यांच्या कुटुंबीयांना २५००० रुपये मदत म्हणून देण्यात आले. मातोश्री कामगार पतसंस्था यांचे एकूण भाग भांडवल रू ७ कोटी असून जवळपास सुमारे ११ कोटी कर्ज वाटप यांनी केले असून मयत सभासद कामगार यांच्या कुटुंबीयांना रुपये २०००० एवढी मदत करण्यात आली. रायरेश्वर यांच्या कडून ५७५८००० व मातोश्री यांच्या कडून ५६६०००० सन २०२१ २२ ला एवढा लाभांश वाटप करण्यात आले . बदलत्या काळानुसार सुसज्ज संगणक प्रणाली , एस एम एस बँकिंग प्रिंटिंग पासबुक अशा आधुनिक सुविधा हे सभासद यांना पुरवतात.
वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यक्रमाचे अध्यक्ष इरफान सय्यद, प्रमोद मामा शेलार, महारष्ट्र मजदुर संघटनेचे सचिव प्रवीण जाधव, प्रमाणित लेखा परीक्षक सहकारी पतसंस्थ पुणे अरुण भोसले साहेब, सहकार विभागाचे अधिकारी विलास निंबले साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, सर्जेराव कचरे, नागेश व्हणवटे, समर्थ नायकवडी, अरुण जोगदंड, चंद्रकांत पिंगट, श्रीकांत मोरे, तसेच रायरेश्वर माथाडी कामगार पतसंस्था उपाध्यक्ष खंडू गवळी, सचिव सतीश कांठले, खजिनदार विजय खंडागळे, संचालक भीवाजी वाटेकर, ज्ञानदेव घनवट, ज्ञानेश्वर औताडे, रोहित नवले, पराजी व्यवहारे, सुभाष पुजारी, प्रकाश मोरे व्यवस्थापक प्रकाश पवार तसेच मातोश्री सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कदम, उपाध्यक्ष गोरक्ष दुबाले, सचिव परमेश्वर मुके, खजिनदार बाबासाहेब पोते, संचालक जस्विरसिंग राणा, अशोक देवकाते, वनदेव खामकर, अशोक साळुंके, खंडू थोरवे, व्यवस्थापक धर्मराज कदम व सर्व सभासद कामगार व कुटुंबीय उपस्थित होते.
सर्वसाधारण सभेत सामाजिक सहकार कामगार क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मृत पावलेले सभासद, कार्यकर्ते, शहीद जवान, पतसंस्थेचे सभासद यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सभेचं सूत्र संचालन सर्जेराव कचरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here